Corona Vaccination 
नाशिक

नाशिक शहरात सलग तिसऱ्या दिवशी लसीकरण बंद; नागरिकांच्या चकरा सुरूच

कोरोना संसर्गाला आळा घालण्यासाठी देशभरात १६ जानेवारीपासून कोव्हिशील्ड व कोव्हॅक्सिनचे डोस देण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे

विक्रात मते

नाशिक : कोरोना संसर्गाला आळा घालण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने कोव्हिशील्ड (Covishield) व कोव्हॅक्सिन (Covaxin) लस टोचण्याची सुरू केलेली मोहीम (Vaccination) सोमवारी (ता. ३)देखील पुरवठा न झाल्याने बंद पडली होती. लशींचे डोस प्राप्त झाल्यानंतर पुन्हा नव्याने मोहीम सुरू केली जाणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली. (Vaccination closed for third day in a row in Nashik)

कोरोना संसर्गाला आळा घालण्यासाठी देशभरात १६ जानेवारीपासून कोव्हिशील्ड व कोव्हॅक्सिनचे डोस देण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. राज्य शासनाकडून जिल्हा रुग्णालयाकडे कोव्हिशील्ड व कोव्हॅक्सिनचे डोस प्राप्त होतात. आतापर्यंत महापालिकेला कोव्हिशील्डचे दोन लाख ५१ हजार ६५० डोस, तर कोव्हॅक्सिनचे ४३ हजार ९६० डोस प्राप्त झाले होते. कोव्हॅक्सिन डोस काही प्रमाणात शिल्लक असल्याने गुरुवारपर्यंत मोहीम अडखळत पार पडली. आरोग्य विभागाने महापालिकेला सोमवारी ३० हजार लशींचे डोस उपलब्ध करून दिल्याने त्यावर मोहीम सुरू राहिली. गुरुवारी सकाळी सुमारे साडेअकरा हजार डोस पुन्हा उपलब्ध करून देण्यात आले. मात्र शुक्रवारी संपूर्ण डोस संपुष्टात आल्याने शनिवार व रविवार असे दोन दिवस लसीकरण बंद करण्यात आले होते. रविवारी डोस प्राप्त होऊन सोमवारपासून पुन्हा नव्याने मोहीम राबविण्याचे नियोजन करण्यात आले होते; परंतु डोस न आल्याने सलग तिसऱ्या दिवशी मोहीम बंद राहिली. लस कधी प्राप्त होणार याबाबत निश्‍चिती नाही.

महापालिकेच्या २७ व खासगी २२ केंद्रांवर नागरिकांच्या रोजच्या चकरा सुरू आहेत. आरोग्य विभागाकडे जास्त लशींची मागणी नोंदविण्यात आली आहे. साठा उपलब्धतेनुसार लसीकरण केले जात असल्याची माहिती वैद्यकीय विभागाच्या समन्वयक डॉ. अजिता साळुंखे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: गणेशोत्सवात सोनं स्वस्त! सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण; उच्चांकापेक्षा ₹27 हजारांनी कमी, पाहा आजचा भाव

Jalgaon Crime : जळगाव हादरलं! गणपतीच्या तयारीदरम्यान सैनिकाच्या पत्नीनं 5 वर्षांच्या चिमुरड्यासह पंख्याला ओढणीच्या सहाय्याने घेतला गळफास

आशिया कपची ट्रॉफी जिंकली, पण टीम इंडियाची ‘ही’ कमकुवत बाजू आली समोर; ५ सामन्यांत १३ झेल सोडले, मुझुमदार म्हणाले- सुधारण्यासाठी मेहनत सुरू

Latest Marathi News Update : मनोज जरांगे पाटील ११ वाजता अंतरवाली सराटीतून मुंबईचे दिशेने रवाना होणार

Rajaram Puri Ganesh Procession : पहिल्याच दिवशी ओलांडली आवाजाची मर्यादा राजारामपुरी गणेश आगमन मिरवणूक ; आकर्षक विद्युत रोषणाई, ‘सिग्नल’मुळे वेळेचे गणित बसले

SCROLL FOR NEXT