vani boy idea.jpg 
नाशिक

VIDEO : कोरोना म्हणतोय.."मी लय डेंजर! माझ्याजवळ आलात तर बघा"..युवकाने लढविली अनोखी शक्कल

दिगंबर पाटोळे : सकाळ वृत्तसेवा

नाशिक / वणी :  कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा शक्य तितकी जनजागृती करत असतांना आता येथील हमाली करणाऱ्या युवकाने अनोखी शक्कल लढवत नागरिकांमध्ये लक्षवेदक जनजागृती करीत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव आपल्या गावात परीसरात होवू नये म्हणून प्रशासन वेगवेगळ्या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती करीतच आहे. मात्र प्रशासनाच्या आवाहनाला व आदेशाला न जुमानता काही नागरिक घराबाहेर पडून स्वत: बरोबर इतरांनाही कोरोनाच्या संकटात पाडत आहे.

युवकाने लढविली अशी शक्कल

 हे चित्र बघून येथील तीन चाकी सायकलद्वारे माल वाहतूक करुन रोजगार मिळवणारा व अवघे सहावी पर्यंत शिक्षण घेतलेल्या भरत देवराम गांगुर्डे या युवकाने नागरिकांमध्ये कोराेना विषानूच्या संकट आपल्या गावांत येवू नये म्हणून बेजबाबदारीने गांवात फिरणाऱ्यांमध्ये जनजागृती करण्याच्या उद्देशाने भंगारातून सायकलीचे एक एक पार्ट गोळा करुन तयार केलेल्या सायकलीच्या शिटावर खरोखर कोणी बसलेले आहेच, असा कोरोनाग्रस्ताची प्रतिकृती असलेला पुतळा तयार केला आहे. या पुतळ्याच्या डोक्यावर टोपी, डोळ्यांना गॉगल, नाका तोंडाला मास्क लावून  व कपडे घातले आहे. पुतळ्याच्या एका हातात कोरोना विषाणुची प्रतिकृती  तर दुसऱ्या हातात .. 'एकाच ठिकाणी..गर्दी करु नका, आपल्या घरातच रहा.., महत्वाचे काम असेल तरच बाहेर पडा.., शासनाचे आदेशाचे पालन करा.., नाक, तोंड झाकेल असे माक्स बांधा, आपल्या अवती भवती असणाऱ्यांमध्ये १ मीटरचे अंतर ठेवा, सार्वजनिक ठिकाणी थंकु नका, कायद्याचे पालन करा...असा जनजागृतीपर संदेश पुठ्यावर लिहिलेला फलक लावला आहे. 

घरीच थांबा, बाहेर पडू नका...

लॉकडॉऊनमुळे सध्या मालवाहतूकीचे कामही मिळत नसल्याने भरत हा सध्या ही सायकल गावात  फिरवून कोरोना पासून स्वत:ला वाचवा व इतरांनाही वाचवा.. मास्क घाला.. भाऊ. दादा..काका.. ताई.. आक्का.. कोरोना लई डेंजर आहे...घरीच थांबा, बाहेर पडू नका... गो कोरोना गो.. असे रस्त्याने फिरणाऱ्या नागरिकांना सांगूण नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न करीत आहे. भरतची ही अनोखी जनजागृतीची पध्दतीने नागरिकांचे लक्ष वेधून घेत अ्सून ग्रामस्थ भरत करीत असलेल्या जनजागृतीला प्रतिसाद देत अभिनंदनही करीत आहे. 

स्वयंम् प्रेरणेने सहभागी होवून समाजसेवा

काहीशी बारीक शरीर यष्टी असलेला भरत हा सर्व  गावातील सार्वजनिक उत्सव, व सर्व धर्मियांच्या सण- समारंभ,  शाळा- महाविद्यालयातील विविध कार्यक्रमा दरम्यान स्वयंम् प्रेरणेने सहभागी होवून सुरक्षा रक्षकाचा वेष परिधान करुन कुठल्याही मोबदल्याची आशा न बाळगता स्वयमंसेवकाचे कामही करतो. या अगोधर भरतने गणपती उत्सवा दरम्यान भरतने तीनचाकी मालवाहतूक सायकलला आकर्षक सजावट करुन व त्यावर पर्यावरण पुरक गणपतीची प्रतिकृती तयार करुन नागरिकांमद्ये जनजागृती केली आहे. तसेच प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिना निमित्त ग्रामपंचायत गावातील अन्य ठिकाणी ध्वजारोहनास सुरक्षा रक्षक जवानाचा गणवेश घालून प्रवेश द्वारावर उभा राहून  सर्वांना जय हिंद करीत शुभेच्छाही देत असतो.

मदतीचा हात हवा आहे भरतला...
इलेक्ट्रीक वस्तुची दुरुस्ती करुन कुटुंबाचा उदर्निवाह करणारे देवराम गांगुर्डे यांचा भरत हा एकुलता एक मुलगा व. भरत हा सात- आठ वर्षांचा असतांनाच भरतचे मातृक्षत्र हरवले. अतिशय गरीब परीस्थिती असल्याने भरतने सहावी पर्यंतच शिक्षण घेवून शाळा सोडून देत वडीलांना आर्थिक मदत म्हणून गांवात कामे करु लागला. सध्या भरतकडे तीन चाकी मालवाहतूकीची सायकल पण ती सतत नादुरुस्त होत असते. अशा स्थितीच काही वेळेस मोठ्या कष्टाने सायकलवरच माल पोहचवत असतो.  वडीलानांही वयोमानाने कामे होत नसल्याने भरतवरच सर्व जबाबदारी आली आहे. येथील आंबेडकर नगरात झोपडी वजा घरात राहाणारे हे पिता- पुत्र स्वत:च स्वयंपाक करुन दोन घास खातात. त्यांना गरज आहे ती शासकीय घरकुलाची व भरतला मालवाहतूकीसाठी चांगल्या सायकलची..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Explainer: फडणवीस आणि शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका; पण राज ठाकरेंसाठी 'मवाळ भूमिका', नेमकं समीकरण काय? वाचा सोप्या शब्दात

IND vs ENG 2nd Test: २६९, १००* ! शुभमन गिलचे शतक अन् ५४ वर्षांपूर्वीचा विक्रम उद्ध्वस्त; एकाही भारतीयाला नव्हता जमला हा पराक्रम

SBI Bank Manager Viral Video : ''तुला iPhone देईन, शारीरिक संबंध ठेव..’’ म्हणत, महिला कर्मचारीशी घृणास्पद कृत्य करणाऱ्या SBI व्यवस्थापकाचा भांडोफोड!

Yavatmal News: लाखो विद्यार्थ्यांचा खडतर प्रवास! शिक्षणासाठी खेड्यातून ‘अप-डाऊन’, सवलतीच्या पासचा दिलासा पण...

Pune Crime : ४० दिवसांच्या मुलीची साडेतीन लाखांत विक्री; आई-वडिलांसह सहा जणांना अटक

SCROLL FOR NEXT