वसाका.jpg 
नाशिक

त्रिपक्षीय सामंजस्य करारामुळे 'वसाका' सुरू होण्याच्या हालचालींना वेग!

मोठाभाऊ पगार

नाशिक : (देवळा) वसाका व्यवस्थापन, कामगार युनियन व अवसायक यांच्यात गुरुवारी (ता.१०) त्रिपक्षीय सामंजस्य करार झाल्याने वसंतदादा सहकारी साखर कारखाना सुरू होण्याच्या हालचालींना वेग आला आहे. व्यवस्थापन मंडळाने परिपत्रकाद्वारे केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत गुरुवारी कामगार प्रत्यक्ष कामावर हजर झाल्याने २०२०-२१ चा वसाकाचा गळीत हंगाम सुरू होण्याचे संकेत मिळत आहेत. 

या विषयांवर चर्चा

धाराशिव साखर कारखाना संचालित वसाका साखर कारखाना सुरू व्हावा, यासाठी काही दिवसांपासून कामगार नेते व पदाधिकारी आमदार डॉ. राहुल आहेर यांच्या माध्यमातून प्रयत्नशील होते. त्या पार्श्वभूमीवर गुरुवारी आमदार डॉ. आहेर, अवसायक राजेंद्र देशमुख, धाराशिवचे अध्यक्ष अभिजित पाटील, संचालक मंडळ, तसेच कामगार युनियनचे पदाधिकारी अशोक देवरे, कुबेर जाधव आदींच्या उपस्थितीत सामंजस्य करार झाला. यात कर्मचारी यांचा प्रॉव्हिडंड फंड, मागील देणी, दर वर्षाची पगारवाढ, सुट्या व रजा, निवृत्ती वय, कारखाना आवारात धूम्रपान मनाई अशा काही बाबींवर चर्चा झाली. 

हंगाम सुरू होण्याच्या आशा पल्लवित झा

कामगार युनियन नेते व भाडेकरू संस्था यांच्यात आमदार डॉ. आहेर यांच्या उपस्थितीत बैठक होऊन प्रलंबित करारावर चर्चा होऊन अवसायक राजेंद्र देशमुख यांच्यासमोर यशस्वी तोडगा निघाल्याने वसाकाच्या मुख्य प्रवेशद्वारावर दोनशेपेक्षा जास्त कामगारांनी हजेरी लावली. कामगारांनी मशिनरी सफाईच्या प्रत्यक्ष कामास सुरवात केल्याने आगामी गळीत हंगाम सुरू होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. वसाका कार्यस्थळावरील बैठकीत संचालक संदीपान खारे, संतोष कांबळे, आबासाहेब खारे, संजय खरात उपस्थित होते. 

प्रतिकूल परिस्थितीवर मात करत वसाका सुरू होण्याच्या दृष्टीने आजचा सामंजस्य करार हा मैलाचा दगड आहे. वसाका व्यवस्थापन व कामगार युनियन यांच्यात आता कोणताही वाद होऊ न देता वसाकाला पुनर्वैभव मिळवून देणे हे सर्वांचे कर्तव्य आहे. - आमदार डॉ. राहुल आहेर 

वसाका सुरू होणे हा कामगारांच्या दृष्टीने जीवन-मरणाचा प्रश्न होता. आमदारांच्या मध्यस्थीने कामगार व व्यवस्थापन यांच्यात यशस्वी तडजोड झाली आणि आमच्या संघर्षाला व प्रयत्नांना यश मिळाले याचा आनंद आहे. वसाकासाठी कामगारांकडून सर्वोतपरी प्रयत्न केले जातील. - अशोक देवरे (अध्यक्ष), कुबेर जाधव (कार्याध्यक्ष) वसाका कामगार युनियन 

वसाका गतिमान करण्यासाठी आमचा प्रत्येक घटक प्रयत्नशील आहे. शेतकरी, कामगार, सभासद यांचे सहकार्य अपेक्षित आहे. - अभिजित पाटील, अध्यक्ष, धाराशिव उद्योगसमूह 

संपादन - किशोरी वाघ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

Mumbai Nashik Highway: मुंबई-नाशिक महामार्गाची दुरावस्था, शरद पवार गटाचा संताप; उच्च न्यायालयात धाव

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर

Mumbai University: मुंबई विद्यापीठात इतर भाषिकांना मिळणार मराठीचे ऑनलाइन धडे

SCROLL FOR NEXT