vedprakash.jpg
vedprakash.jpg 
नाशिक

चीनी ॲपचा बहिष्कार करत भूमिपुत्राने बनवले "भारत फाईल मॅनेजर!" अनेकांना भावताएत फिचर्स..

संतोष विंचू

नाशिक / येवला : प्राथमिक शिक्षक असलेले वाल्मीक वाघ यांचा वेदप्रकाश हा मुलगा असून कॉम्प्युटर इंजिनिअरिंग करत असल्यापासून त्याने अँड्रॉइड ॲप बनवले आहे. नोकरीच्या मागे न धावता ड्रॉयडर कंपनीच्या माध्यमातून तो अनेक गेम्स बनवत असून यापूर्वी बनवलेले व्हाटस अँप सेवर हे अँप लोकप्रिय झाले आहेत.

चिनी ॲपचा बहिष्कार...बनविले नवे ॲप

देशाचा शत्रू असलेल्या चीनशी मोठ्या-मोठ्या कंपन्या करोडोंचे व्यवहार तोडत आहे. त्यांच्या विविध अँप वर भारत सरकारने बहिष्कार टाकलाय मग आपणही या मोहिमेत उतरून स्वदेशी पर्याय उपलब्ध करून द्यावेत हा हेतू मनात घेऊन राजापूर (ता.येवला) येथील भूमिपुत्र असलेल्या वेदप्रकाश वाघ याने भारत फाईल मॅनेजर नावाचे ॲप कार्यान्वित केले आहे. इतर फाईल मॅनेजरच्या तुलनेत बहुपयोगी सुविधा असलेले हे मॅप अनेकांना भावत असून त्याच्या कल्पकतेचे कौतुक होत आहे.

अ‍ॅप एक छान रॅम क्लीनरसह उपलब्ध
प्राथमिक शिक्षक असलेले वाल्मीक वाघ यांचा वेदप्रकाश हा मुलगा असून कॉम्प्युटर इंजिनिअरिंग करत असल्यापासून त्याने अँड्रॉइड ॲप बनवले आहे.नोकरीच्या मागे न धावता ड्रॉयडर कंपनीच्या माध्यमातून तो अनेक गेम्स बनवत असून यापूर्वी बनवलेले व्हाटस अँप सेवर हे अँप लोकप्रिय झाले आहेत. ज्यावेळी इंडियन ब्राउजर वापराची चर्चा सुरू झाली त्यावेळेस भारतातील मोबाईल धारकांनाही ही पर्याय उपलब्ध झाले पाहिजे या विचारातून त्याने या अँपला अद्यावत करत विविध पर्याय देऊन प्ले स्टोरवर
(https://play.google.com/store/apps/detailsid=tech.droidr.indian.filemanager) वापरकर्त्यांना उपलब्ध करून दिले आहे. मोठ्या मेहनतीने त्याने हे अँप बनवले असून अनेक पर्यायी हे त्याचे वैशिष्ट्य आहे. मोबाईल आणि एसडी कार्डवर शिल्लक मेमरी किती हे सहजपणे यातून कळणार असून मोकळी जागा शोधत असाल तर आपण सहजपणे फोनवरून एसडी कार्डवर फायली हटवणे, कट, कॉपी, पेस्ट करू शकता.

दोन्ही डिव्हाइस एकाच वायफाय नेटवर्कवर

अ‍ॅप एक छान रॅम क्लीनरसह आला आहे, जो पार्श्वभूमीत चालू असलेल्या अनावश्यक प्रक्रिया व अँप स्वच्छ करण्यास मदत करताना मोबाइलची कार्यक्षमता, गती वाढवते.आपल्या स्टोरेजवर ॲप घेण्यासाठी दुसऱ्या ॲपची आवश्यकता नाही. जेणेकरून इंटरनेट वापराविना तुमच्या मित्रांना फाइल्स सेंड करता येतील. दोघे एकाच वायफाय कनेक्शनवर असल्यास आपली चित्रे,दस्तऐवज, अनुप्रयोग किंवा व्हिडिओ सहजपणे शेयर करता येतात.फायली सहजतेने कम्प्रेस करू शकता.महत्वाचे म्हणजे आपला फोन आणि कॉम्प्यूटरदरम्यान कोणत्याही डेटा केबल शिवाय आपल्या फायली सहजतेने हस्तांतरित करू शकता.फक्त दोन्ही डिव्हाइस एकाच वायफाय नेटवर्कवर असले पाहिजे.

काय आहे अँपमध्ये...
# फायली सामायिक,शेयर करा
# फोनची मेमरी,रॅम स्वच्छ करा आणि कार्यक्षमता वाढवा
# जलद आणि सुलभ फायली पहा
# अ‍ॅप बॅकअप करा
# फोन आणि कॉम्प्यूटरमध्ये वायरलेस फाइल ट्रान्सफर करा
# स्टोरेज (मेमरी कार्ड) तपासा
# फोनवर अ‍ॅप्स बॅकअप करा
# फायली ऑफलाइन सामायिक,शेयर करा
# अंतर्भूत फाइल कंप्रेसर
# वायफाय वापरून डेटा ट्रान्सफर करा
# पासवर्ड देऊन तुमच्या फाइल्स सुरक्षित करा

“चीन त्याच्या डिजिटल यंत्रणा सुरक्षित ठेवण्यासाठी गुगल,फेसबुकला देखील मर्यादा घालते तर आपणही अशी काळजी घेतली पाहिजे.तंत्रज्ञानाद्वारे शासित या जगात डिजिटल सीमांचे रक्षण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.यातूनच प्रेरणा घेऊन मी हे अ‍ॅप बनवले आहे.अनेक पर्याय त्यात असल्याने याला उत्तम प्रतिसाद मिळत असूनयात अजून नवीननवीन अपडेट देण्याचे काम करत आहेत.”-वेदप्रकाश वाघ,कॉम्प्युटर इंजिनिअरिंग

रिपोर्टर - संतोष विंचू

(संपादन - ज्योती देवरे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : राजस्थान क्वालिफाय करणार की हैदराबाद मजबूत स्थितीत पोहचणार?

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

PPF : दररोज 250 रुपये वाचवून तयार होईल 24 लाखांचा फंड, कसा ते वाचा ?

Rinku Singh T20 WC 2024 : रोहितला जास्त पर्याय... रिंकू सिंहला वगळण्याबाबत अजित आगरकर काय म्हणाला?

SCROLL FOR NEXT