Municipal and police administration while carrying out encroachment campaign from Vinchur Chauphuli to Indranil corner.
Municipal and police administration while carrying out encroachment campaign from Vinchur Chauphuli to Indranil corner. esakal
नाशिक

Nashik News: भररस्त्यातील भाजीबाजार हटविला! विंचूर चौफुली ते इंद्रनील कॉर्नरपर्यंत पालिकेची साफसफाई

सकाळ वृत्तसेवा

येवला (जि. नाशिक) : दररोजच्या भाजीविक्रेत्यांना बसण्यासाठी जागा ठरवून दिलेली असताना शहरात प्रवेश होतो त्या विंचूर चौफुलीपासून थेट इंद्रनील कॉर्नरपर्यंत भररस्त्यातच भाजी व फळे विक्रेते बसतात.यामुळे वाहतुकीचा खेळखंडोबा होऊन थेट विंचूर चौफुलीवर महामार्गावर सुद्धा वाहतूक कोंडी होते.

यामुळे पुन्हा एकदा पालिका ॲक्शन मोडमध्ये आली असून आज विशेष मोहीम राबवत मनमानी करून दुकाने थाटणाऱ्या भाजीपाला व फळे विक्रेत्यांची दुकाने व पाल पालिकेने जप्त केली आहेत. (vegetable market removed Municipal cleaning from Vinchoor Chauphuli to Indranil corner Nashik News)

शहरातील विंचूर चौफुली ते इंद्रनील कॉर्नरपर्यंत भाजीपाला व फळविक्रेत्यांनी केलेले अतिक्रमण पालिका व शहर पोलिस ठाण्याच्या संयुक्त कारवाईने हटविण्यात आले. विंचूर चौफुलीवरील अनधिकृत फळ विक्रेते व इंद्रनील हॉटेल कॉर्नर येथील भाजीपाला विक्रेते यांनी महामार्गालगत मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण केले होते.

वेळोवेळी पालिका कार्यालयात या विक्रेत्यांची बैठक घेऊन मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर यांनी पालिकेने तयार केलेल्या भाजीपाला व फळ विक्रेतेसाठी केलेल्या ओट्यावर बसावे अशा सूचना दिल्या होत्या. परंतु विक्रेते वारंवार दुर्लक्ष करत विंचूर चौफुलीपासून इंद्रनील कॉर्नरपर्यंत विक्रीसाठी बसत असत.

यामुळे नाशिक मार्गाकडून शहरात प्रवेश कसा करावा आणि केला तर आत कसे जावे हा प्रश्न वाहन धारकांसह पादचाऱ्यांना पडत आहे. किंबहुना याचमुळे नाशिक- औरंगाबाद व मनमाड- नगर महामार्गाची वाहतुकीची कोंडी सुद्धा वाढत चालली असल्याने आज पालिकेने पुन्हा एकदा धडक मोहीम राबविली.

पालिका व पोलिस प्रशासनाने रहदारीला अडचण निर्माण करणाऱ्या अनधिकृत टपऱ्या व इतर साहित्य जप्त करून अतिक्रमण हटविले. नागरिकांसाठी दैनंदिन बाजाराची व्यवस्था ओट्यांचे बांधकाम पालिकेने करून दिले आहे.

तथापि नगरपरिषदेने वेळोवेळी सूचना देऊन देखील विक्रेते त्या ठिकाणी बसून व्यवसाय करत नव्हते. त्यामुळे विंचूर चौफुलीवर विक्रेत्यांची जास्त गर्दी झाल्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होत होता.

पालिकेने शहरातील सर्व भाजीपाला व फळ विक्रेत्यांना नवीन बाजारतळात बसूनच व्यवसाय करावा अन्य ठिकाणी बसून रहदारीस अडथळा आणू नये असे आवाहन केले आहे. यापुढे देखील अतिक्रमण हटाव मोहीम सुरू राहणार असल्याचा इशारा दिला आहे.

हेही वाचा : बँक खात्याला जोडलेल्या सिमकार्डबाबत बाळगा ही काळजी...

अतिक्रमण मोहिम पालिका प्रशासक तथा मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. याप्रसंगी शहर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक सूरज मेढे, पालिकेचे कर विभाग प्रमुख आदित्य मुरकुटे, नगररचना विभागप्रमुख भावे, स्वच्छता निरीक्षक सागर झावरे, तुषार लोणारी, पोलिस हवालदार अंकुश हेंबाडे व खेमनार दादा, सर्व नगरपालिका कर्मचारी व स्वच्छता विभागातील कर्मचारी उपस्थित होते.

"भाजीपाला व फळे विक्रेत्यांना भव्य व नूतन ओट्यांसह व्यवस्था करून दिलेली आहे. या ठिकाणी सर्वांनी बसण्याच्या सूचना देऊनही त्याचे पालन होत नाही. विक्रेते बाजार तळातच बसले तर नक्कीच बाजाराला शिस्त लागेल पण एकेक करत सर्वजण रस्त्यावर येत असल्याने वाहतुकीचा व शिस्तीचा खेळखंडोबा होत आहे. यामुळे आजची मोहीम राबविली असून सर्व विक्रेत्यांनी आता नेमून दिलेल्या जागेवरच बसावे, नागरिकांची गैरसोय करू नये. अन्यथा पुन्हा कारवाई केली जाईल." - नागेंद्र मुतकेकर, मुख्याधिकारी, नगरपालिका, येवला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

IPL 2024 RCB vs GT Live Score: फाफ डू प्लेसिसची फिफ्टी, तर विराटने पुन्हा मिळवली ऑरेंज कॅप

Weather Update : पुण्यात उन्हाचा चटका कायम राहणार; राज्यात वादळी पावसाला पोषक वातावरण

Lok Sabha Election 2024 : ४०० पार घोषणा, पण भाजप अडीचशे जागांवर अडकणार

SCROLL FOR NEXT