Village Development Officer of Ghoti Gram Panchayat suspended nashik news esakal
नाशिक

Nashik News : घोटी ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी निलंबित

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : घोटी बु. ( ता. इगतपुरी ) येथील ग्रामविकास अधिकारी रविंद्र सुधाकर धुंदाळे यांचे अखेर चौकशी अंतर्गत निलंबन केल्याचे आदेश मुख्यकार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी इगतपुरी गटविकास अधिकारी यांना दिले आहे. (Village Development Officer of Ghoti Gram Panchayat suspended nashik news)

धुंदाळे हे घोटी येथे कार्यरत असतांना त्यांनी कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी सदर कार्यवाही करण्यात आली आहे. धुंदाळे यांच्यावर ग्रामपंचायत अंतर्गत व्यावसायिक गाळे बांधकामाची ई-निविदा काढतांना मक्तेदाराची क्षमता नसतांना गाळे बांधण्याचे काम सोपवण्यात आले.

प्रथम गाळे मालकाकडून डिपॉजिट परत केल्यानंतर नवीन व्यक्तीस विहित पद्धतीने कारवाई करून व्यावसायिक गाळा भाडेतत्वावर न देणे, ग्रामपंचायतच्या व्यावसायिक गाळ्यांचा लिलाव करतांना लिलाव अटीतील ( क्रं. ६ चा) भंग करत लिलाव धारकाची रक्कम जप्त करून फेर लिलाव न करणे तसेच ग्रामपंचायत घोटी येथील मिळकत क्रं ६१० व ६११ दत्तात्रय हरिभाऊ शिंदे यांच्या बांधकामाची चुकीची नोंद केल्याप्रकरणी जिल्हा परिषदेने दोषारोपपत्र पंचायत समितीने पाठवलेल्या अहवालनुसार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी कार्यवाही करत ग्रामसेविकास अधिकारी रविंद्र सुधाकर धुंदाळे यांचे निलंबनावर अखेर शिक्कामोर्तब केले.

निलंबनानंतर धुंदाळे यांना सुरगाणा पंचायत समिती मुख्यालय येथे कार्यवाही पूर्ण होईपर्यंत वर्ग करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court Crackers Ban : सर्वोच्च न्यायालयाचा फटाक्यांबाबत मोठा निर्णय; देशभरात बंदी घालता येणार नाही पण...

IND vs WI 2nd ODI : वादाला निमित्त! OUT or NOT OUT? नमन धीरचा अफलातून झेल, पण विंडीजला तो नाही पटला... Video पाहून ठरवा

Maratha Reservation: अंतरवालीमधील कोणी टीका केली तर दुर्लक्ष करा ; जरांगे . गावाचे योगदान विसरणार नाही

Latest Marathi News Live Update : काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी सिरीवेल्ली प्रसाद पाच दिवस मुंबई दौऱ्यावर; बैठकांना सुरुवात

OBC Development : ओबीसींच्या विकासासाठी एक रुपयांत जागा;उपसमितीच्या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश

SCROLL FOR NEXT