village has not had electricity for four days nashik sakal  
नाशिक

चार दिवसांपासून गाव अंधारात; संतप्त ग्रामस्थांचा तीव्र आंदोलनाचा इशारा

संदिप मोगल

नाशिक/लखमापूर : सद्याच्या विज्ञानाच्या युगात माणूस एक मिनिट देखील विजेशिवाय राहू शकत नाही पण दिंडोरी तालुक्यातील जवळपास तीन हजार लोकसंख्येचे गाव गेल्या चार दिवसापासून हा अनुभव घेत आहेत.

काय आहे कारण?

गावाची लोकसंख्या तीन हजार आहे. इतक्या मोठ्या गावासाठी  फक्त एकच ट्रान्सफार्मर लावण्यात आला आहे. हा ट्रान्सफार्मर सदोदित नादुरुस्त असतो कारण एवढ्या लोकसंख्येला तीन ट्रान्सफार्मर ची आवश्यकता असताना एकच ट्रान्सफार्मर वर लोड येतो त्यामुळे नागरीकांना सतत अंधाराचा सामना करावा लागतो. यावर उपाय करण्यासाठी   ग्रामपंचायती मार्फत वीज वितरण कंपनीला वेळोवेळी निवेदन दिले. पण वीज वितरण कंपनी कडून प्रत्येक वेळी केराची टोपली दाखवली जात असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

चार दिवसापासून अंधारात

आज चार दिवसापासून ग्रामस्थ पूर्ण अंधारात आहे. ग्रामपंचायतीने  वणी, दिंडोरी, नाशिक, तेथील विजवितरणाच्या कार्यालयात निवेदन दिले पण अधिकारी जाणूनबूजून कानाडोळा करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. यावर त्वरीत निर्णय न झाल्यास ग्रामपंचायत व ग्रामस्थ तीव्र आंदोलन करतील असा इशारा तिसगावच्या सरपंच हिराबाई ढगे तसेच ग्रामपंचायत सदस्य यांनी दिला आहे. याबाबत अधिक माहितीसाठी वणी च्या वितरण विभागाच्या अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनी वर संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही .ग्रामस्थांनी ही संबंधित अधिकारी फोन उचलत नसल्याची तक्रार केली आहे.

संपादन - रोहित कणसे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT