manur2.jpg 
नाशिक

रात्रीस खेळ चाले! 'इथं' कुंपनच खातंय शेत...ग्रामस्थांच्या चालाखीने पर्दाफाश

सकाळवृत्तसेवा

नाशिक : (ताहाराबाद) रात्री अंधाराचा फायदा घेत चालू त्याचा कारनामा...विचारणा केली तर त्यांचा उडाला गोंधळ. मात्र त्यांचा डाव स्थानिक ग्रामस्थांनी पक्का हेरला. अन् त्यांना पकडले रंगे हात...चोरी करणारे दुसरे तिसरे कोणी नसून चक्क तेच होते. धक्कादायक, येथे कुंपनच खातंय शेत... हा प्रकार घडला बागलाण तालुक्यातील मानूर येथे...

असा आहे प्रकार

लॉकडाऊनच्या काळात आदिवासी विकास विभागांच्या आश्रमशाळेतील धान्य अनुसूचित जमातीच्या नागरिकांना तसेच गरजू कुटुंब, रेशनकार्ड नसलेले, निराधार, अपंग,विधवा अशा गरजू व्यक्तींना नियोजन करून वाटप करण्याचे आदेश आहेत. असे असताना मानूर (ता.बागलाण) येथील शासकीय आश्रम शाळेतील मुख्याध्यापक, अधीक्षक यांच्या धान्य चोरीचा पर्दाफाश स्थानिक ग्रामस्थांनी गुरुवारी (ता.8 ) रात्री केला तर आश्रमशाळा अधिक्षकांनी रोजंदारी कर्मचाऱ्यांनाच हे धान्य देण्यात येत होते असे सांगितले. रात्री अकरा वाजेच्या सुमारास शाळेतील कर्मचारी धान्य चोरून घेऊन जाताना गावातील तरुणांनी रंगेहाथ पकडले. याबाबत शाळेचे अधीक्षक पि.यू.संगेवार यांना तरुणांनी विचारणा केली असता ते उत्तर न देता निघून गेले. तहसीलदार जितेंद्र इंगळे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून संबधीताची कानउघाडणी करून याचा अहवाल प्रकल्प अधिकारी यांना पाठवण्याचे व उर्वरित धान्य लगेच सर्वासमक्ष गरजूंना वाटण्याचा आदेश दिला. यावेळी पंचायत समिती सदस्य पंडित अहिरे ,पंढरीनाथ गांगुर्डे. उत्तम बहीरम, आत्माराम बहिरम, रंगनाथ गांगुर्डे, निलेश गांगुर्डे, किरण सूर्यवंशी आदी उपस्थित होते. 

हे धान्य आमच्या शाळेतील रोजंदारी कर्मचाऱ्यांना देण्यात आले होते. त्यांचे वेतन झाले नसून ते परभणी जिल्ह्यातील असल्याने ते गावी जाऊ न शकल्यामुळे त्यांना दिले. 
- पि.यू.संगेवार, अधीक्षक, आश्रमशाळा (मानूर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Sooryavanshi: झिम्बाब्वे मालिका गाजवल्यानंतर वैभव सूर्यवंशी पुन्हा मैदानात; जाणून घ्या कधी, कुठे आणि कोणत्या संघाकडून खेळणार पुढचा सामना

Pune Flood Alert: पुण्यात अलर्ट! खडकवासला धरणातून मोठा विसर्ग; बाबा भिडे पूल पाण्याखाली, रस्ता बंद, युवकाची अग्निशामक दलाकडून सुटका

Nanded Water: नांदेडकरांसाठी दिलासादायक बातमी! विष्णुपुरी धरणाच्या पाणीसाठ्यात एका दिवसात 9 टक्क्यांची वाढ, धरणांना जीवदान

Latest Marathi News Live Update : शनिवार आणि रविवारी किल्ले सिंहगड राहणार बंद

Commonwealth Games 2026: सायकल दुरूस्तीचे काम करणाऱ्या बापाच्या लेकीने इतिहास घडवला... ज्युदोत पक्कं केलं पदक, कोण आहे अस्मिता डे?

SCROLL FOR NEXT