Id Card
Id Card esakal
नाशिक

Nashik News : गावकारभाऱ्यांना मिळणार ओळखपत्र; ग्रामपंचायत विभागाचे आदेश

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : जिल्ह्यातील सरपंचांची थेट निवड झाल्यानंतर, आता या सरपंचांना शासनाचे ओळखपत्र मिळणार आहे. जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने गटविकास अधिकाऱ्यांना आदेश देत नव्याने निवड झालेल्या सर्व सरपंचांना शासकीय ओळखत्र द्यावेत, असे आदेश दिले आहेत.

या आदेशामुळे दोन वर्षात निवड झालेल्या पाचशेहून अधिक सरपंचांना ओळखपत्र मिळणार आहेत. (Villagers will get identity cards Orders of the Gram Panchayat Department Nashik News)

हेही वाचा : द मिसिंग टाइल सिंड्रोम ठेवा आपल्यापासून दूर

जिल्हा परिषद अध्यक्ष, सभापती, पंचायत समिती सभापती यांसह सरपंच यांची निवड झाल्यानंतर ११ फेब्रुवारी २०१४ च्या शासन आदेशानुसार शासकीय ओळखपत्र देण्यात येते. उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकाऱ्यांना पत्र देत नव्याने निवड झालेल्या सरपंचांना ओळखपत्र द्यावेत, असे आदेश दिले आहेत.

त्यासाठी ओळखपत्राचा नमुनाही देण्यात आला आहे. या नमुन्यातच ओळखपत्र द्यावे, असे सांगण्यात आले आहे. २०२१-२२ या आर्थिक वर्षात जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या आहेत.

डिसेंबर २०२२ मध्ये १९६ ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या आहेत. त्यामुळे या आर्थिक वर्षात ५०० हून अधिक ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या आहेत. यंदा सरपंचांची थेट निवडणूक झालेली आहे. या सर्व नवनियुक्त सरपंचांना शासकीय ओळखपत्र मिळणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Lok Sabha: "विशाल पाटलांवर शिवसेनेचा अन्याय"; भाजपचे केंद्रीय मंत्री काय बोलून गेले...

Raghuram Rajan: संपत्ती वितरणावर रघुराम राजन यांचे वक्तव्य चर्चेत; म्हणाले, ''श्रीमंतांवर कर...''

KKR vs DC : कोलकत्याच्या मार्गात दिल्लीचा अडथळा! सुनील नारायणचा पुन्हा दिसणार ‘वन मॅन शो’.... की जेक फ्रेसर मॅर्कगर्क घालणार तांडव

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज सोलापुरात सभा

दहा मिनिटांमध्ये लिहिलेल्या मंगलाष्टका अन् मोहन जोशींचा किस्सा; 'असा' शूट झाला होता राधा-घनाच्या लग्नाचा एपिसोड

SCROLL FOR NEXT