Gangapur Dam File Photo
Gangapur Dam File Photo esakal
नाशिक

Jayakwadi Dam: गंगापूरचे पाणी मराठवाड्याला सोडल्यास द्राक्ष बागा धोक्यात; जायकवाडीला पाणी सोडण्यास तीव्र विरोध

सकाळ वृत्तसेवा

Jayakwadi Dam : छत्रपती संभाजीनगरमधील बियर कंपन्या जगवायच्या आणि नाशिक जिल्ह्यातील बारमाही बागायती शेती उजाड करायची, ही कूटनीती आहे. मराठवाड्याला गंगापूरचे पाणी सोडले, तर आम्ही द्राक्षबागा कशा जगवायच्या? बँका व सोसायटीचे कर्ज कसे फेडायचे? बारा वर्षे झाले, अजूनही मेंढेगिरी समितीच्या अहवालाचे पुर्नसर्वेक्षण झालेले नाही.

यंदा दुष्काळाने मारले. आता गंगापूर डाव्या कालव्यावरील शेती उजाड होणार काय, असा संतप्त सवाल कसबे सुकेणेसह बाणगंगा काठच्या गंगापूर डाव्या कालव्यावरील गावांनी उपस्थित केला आहे. (vineyards will be in danger If Gangapur dam water is released to Marathwada nashik news)

यंदा नाशिक जिल्ह्यातील अत्यल्प पाऊस पडल्याने निफाड तालुका दुष्काळग्रस्त झाला आहे. गंगापूर धरणाच्या डावा कालवा वितरिका लाभक्षेत्रात निफाड तालुक्यातील ओझर, दिक्षी, दात्याणे, जिव्हाळे, थेरगाव ओणे, कसबे सुकेणे, मौजे सुकेणे, पिंपरी या गावांचा समावेश आहे. या गावांतील शेती व पिण्याचे पाणी गंगापूर धरणावर अवलंबून आहे. दरवर्षी या गावांसाठी पिण्याचे पाण्यासाठी रोटेशन सोडले जाते.

यंदा गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आणि निफाड तालुक्यात अत्यल्प पाऊस पडल्याने दुष्काळ पडला आहे. नाशिक जिल्ह्याचा द्राक्षपट्टा म्हणून ओळखला जाणारा बाणगंगा काठच्या गावांत कोट्यवधी रुपये गुंतवणुकीची द्राक्ष, गुलाब, फळ-फूल, भाजीपाला शेती शेतकरी बारमाही करतात. कमी पावसामुळे व जायकवाडीत पाणी सोडल्यावर निर्माण होणाऱ्या पाणीटंचाईमुळे हा परिसर उजाड होण्याची भीती शेतकऱ्यांना आहे.

गंगापूर डावा कालव्यावर कसबे सुकेणे ते ओझरदरम्यान सुमारे दहा पाणी वापर संस्था अवलंबून आहेत. पाणी वापर संस्थांच्या अधिपत्याखाली परिसरातील शिवार ओलिताखाली येतो. जायकवाडी धरणात गंगापूर धरणाचे पाणी सोडल्यास भीषण जलसंकट तयार होऊन फळ, फूल व द्राक्षबागा जळून जातील. आम्ही बँका, सोसायटीचे कर्ज कसे फेडायचे, असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

"ओझर ते कसबे सुकेणे परिसरातील सर्व गावांमध्ये सध्या तीव्र पाणीटंचाई आहे. शेती शिवारातील सर्व विहिरींनी तळ गाठला आहे. डावा कालव्यावर १० पाणी वापर संस्था आहेत. गंगापूर धरणातून आम्हाला पाणी न मिळाल्यास परिसरातील शेती उजाड होईल. त्यामुळे जायकवाडीला पाणी सोडण्यास आमचा विरोध आहे." -धोंडीराम जाधव, संस्थापक अध्यक्ष, भैरवनाथ पाणी वापर संस्था, कसबे सुकेणे

"मेंढेगिरी समितीचा अहवाल चुकीचा आहे. मुळात जायकवाडी धरणाची निर्मिती चुकीच्या पद्धतीने झाली आहे. १२ वर्षांनंतर मेंढेगिरी समितीनुसार फेरसर्वेक्षण होणे गरजेचे आहे. सर्वेक्षण होत नसून सध्या जायकवाडी धरणात दोन वर्षेपुरेल इतके पाणी आहे.

चुकीच्या अहवालाचा आधार घेत जायकवाडीत पाणी सोडण्याचा आग्रह मराठवाड्यातून होत आहे, हे अतिशय चुकीचे आहे. गंगापूर डावा कालव्या क्षेत्रातील सर्व बागायती क्षेत्र उजाड होईल. त्यामुळे आमचा जायकवाडीला पाणी सोडण्यास तीव्र विरोध आहे." -अर्जुन बोराडे, जिल्हाध्यक्ष, शेतकरी संघटना

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Lok Sabha Election : बाबाजी‘ फॅक्टरमुळे नाशिकमध्ये ‘काटे की टक्कर', शेवटच्या दोन दिवसात आले महत्व

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: धुळ्यात एल एम सरदार हायस्कूल येथील ईव्हीएम बंद पडल्याने गोंधळ

Mobile Hacks: 'या' सोप्या ट्रिक्स वापरा, मोबाईलमधील फोटो डिलिट करण्याची येणार नाही वेळ

Lok Sabha Election: विरोधकांनीही मुस्लिम उमेदवारांना ठेवले दूर! 2019 च्या तुलनेत 2024 ची स्थिती काय?

RCB vs CSK: धोनीच्या षटकारामुळे रिंकूची आठवण... CSK विरूद्ध शेवटच्या ओव्हरला काय होत्या भावना, यश दयालच्या वडिलांकडून खुलासा

SCROLL FOR NEXT