A vehicle transporting oxygen cylinders on Old Agra Road in Malegaon.
A vehicle transporting oxygen cylinders on Old Agra Road in Malegaon. esakal
नाशिक

Nashik News: मालेगावला मालवाहतूक चालकांकडून नियमांचे उल्लंघन; अवजड वाहनांचा सुळसुळाट

सकाळ वृत्तसेवा

मालेगाव : शहरात यंत्रमाग व प्लॅस्टिक उद्योग मोठ्या प्रमाणात आहे. या उद्योगासाठी लागणाऱ्या कच्च्या आणि पक्का मालाची ने-आण करणारी वाहने दिवसभर वर्दळीच्या ठिकाणांहून धावत असतात. येथे राज्यातील इतर भागातून सुताचे ट्रक व इतर माल घेऊन वाहने येत असतात.

मात्र या मालाची वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांकडून सर्रास वाहतूक नियमांचे उल्लंघन केले जात आहे. त्यामुळे अशा वाहनचालक यांच्यावर कारवाई करण्याची मागणी मालेगावकरांकडून केली जात आहे. (Violation of rules by cargo drivers in Malegaon Congestion of heavy vehicles Nashik News)

शहरात यंत्रमाग व प्लॅस्टिक उद्योग मोठ्या प्रमाणात आहे. या उद्योगांच्या निमित्ताने इतर जिल्ह्यांसह विविध राज्यातून मालाची आयात, निर्यात होत असते.

मात्र या अवजड मालाची वाहतूक करताना वाहनचालक यांच्याकडून सर्रास वाहतूक नियमांचे उल्लंघन केले जात आहे. मात्र याकडे संबंधित विभागाकडून दुर्लक्ष केले जात आहे. यामुळे या वाहनचालकांची चांगलीच मुजोरी वाढली आहे.

शहरात बहुसंख्येने ॲपेरिक्षांवर येथील कच्चे कापड, सुत, गज, कचरा, प्लास्टिक साहित्य, ऑक्सिजन सिलिंडर आदींची वाहतूक केली जाते. मात्र ही वाहतूक करताना कुठल्याही प्रकारचे नियमांचे पालन या चालकांकडून केले जात नसल्याचे दिसत आहे.

शहरात यंत्रमागाचे कापड घेऊन जाणाऱ्या पाचचाकी रिक्षात देखील आवश्‍यकतेपेक्षा जास्त माल भरला जातो. चारचाकी माल भरल्यानंतर अनेकदा लाकडी फळ्‌या लावल्या जात नाही.

त्यामुळे हा माल रस्त्यावर पडून अपघात देखील होत आहे. त्यामुळे अशा वाहनचालक यांच्यावर कठोर कारवाई करीत त्यांना शिस्त लावण्याची मागणी केली जात आहे.

"कुसुंबा रस्त्यावर अवजड वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू होती. धुळे व नाशिक येथे पत्रव्यवहार करून ही वाहने शहरातून बंद केली होती. मात्र काही वाहने पुन्हा शहरात येत आहेत. पुन्हा पत्रव्यवहार करून ही वाहने बंद करणार आहे. नियम मोडणाऱ्या वाहनांवर कारवाई केली जाईल."- देवेंद्र शिंदे, सहाय्यक वाहतूक निरीक्षक, मालेगाव.

"शहरात काही वाहनांना माल वाहतुकीचा परवाना नसताना देखील त्यातून मालाची वाहतूक सर्रास केली जाते. काही वाहनांची कागदपत्रांची वैधता संपुष्टात आली आहे. अशा वाहन मालकांवर कारवाई करावी या कारवाईमुळे अपघात टाळता येईल."

- शफीक शेख, सामाजिक कार्यकर्ते, मालेगाव.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत सरासरी 8 टक्के मतदान

Akshay Kumar: खिलाडी अक्षय कुमारनं भारताचं नागरिकत्व मिळाल्यानंतर पहिल्यांदाच केलं मतदान; म्हणाला, "माझा भारत देश हा..."

Latest Marathi Live News Update: सुनील राऊत पोलिसांवर भडकले

PM Modi : मतपेढीच्या तुष्टीकरणासाठी संस्थांना धमक्या; पंतप्रधानांची ममतांवर टीका

Standing Problems: तुम्हीही जास्त वेळ उभे राहत असाल तर वाढू शकतात 'या' समस्या

SCROLL FOR NEXT