nangre patil 123.png 
नाशिक

"शेतकरी रडतच नाही! कोरोनाच्या संकटात रडत बसायचं??" युवा सरपंचाची उदारता पाहून विश्वास नांगरे पाटील ही भारावले!

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : शेतकरी रडतच नाही, रोज परिस्थितीशी लढतोही. याची जाणीव येथील युवा सरपंच देवीदास देवगिरे यांनी पोलिस कल्याण निधीला दिलेल्या एक्कावन्न हजारांचा निधीतून करुन दिली आहे. कोरोनाशी दिवसरात्र रस्त्यावर लढणा-या पोलिसांना पाठींबा देत त्यांनी वेगळा आदर्श घालून दिला आहे.

सर्व भाजीपाला विकून त्याचे पैसे कल्याण निधीला

तो म्हणाला साहेब शेतक-यांची परिस्थिती कधीच चांगली नसते. म्हणून काय कोरोनाचे संकट आल्यावरही रडत बसायचं? सुरवातीला त्यासाठी संपर्क केल्यावर सर्व शेतकरी अडचणीत आहेत, त्यांची परिस्थिती अडचणीची आहे, तेव्हा तुम्ही का पैसे देताय? कसे देत आहात? अशी शंका उपस्थित केली गेली. मात्र स्वतः अबोल असल्याने त्याविषयी ते फारसे काही सांगू शकले नाहीत. प्रत्यक्ष हा धनादेश दिल्यावर दुरचित्रवाणीच्या प्रतिनिधींनी बाईट मागीतला. त्यावर देखील गोंधळ झाल्याने ते काही बोलू शकले नाही. मात्र एकंदरच कोरोना संदर्भात रस्त्यावर लढणा-या पोलिसांसाठी आपल्या शेतातील सर्व भाजीपाला विकून त्याचे पैसे कल्याण निधीला देऊन एरव्ही रडणाऱ्यांना मात्र त्यांनी लाजवले एवढे मात्र खरे. 

विश्वास नांगरे पाटील यांच्या कार्याने प्रेरीत
पिंपळगाव घाडगा (इगतपुरी) येथील युवा सरपंच देवीदास पोपटराव देवगिरे हे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या कार्याने प्रेरीत आहेत. त्यासाठी ते सतत काही तरी वेगळे करण्याचा प्रयत्न करतात. पोलिसांविषयी सध्या आम्ही बाहेर आहोत त्यामुळे तुम्ही घरीच सुरक्षीत रहा  हे वाक्य कोरोना संदर्भात सातत्याने बोलले जाते. त्यातूनच प्रेरणा घेऊन देवगिरे यांनी त्यांच्या शेतातील कांदे आणि सर्व भाजीपाल्याच्या पिकाची विक्री केली. त्यातून त्यांना जवळपास पन्नास हजार रुपये आले. त्यात स्वतःची काही रक्कम जोडून एक्कावन्न हजार रुपयांचा धनादेश त्यांनी पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांना सुपूर्द केला. 

गावोगावी ग्रामस्थांचे स्वतःच लाॅकडाऊन
सध्या कोरोना संसर्ग सगळीकडे वाढत आहे. अगदी गावोगावी ग्रामस्थांनी स्वतःच लाॅकडाऊन करुन घेतले आहे. विविध उपाययोजना करु लागले आहेत. त्यामुळे कोरोना विरोधातील लोकशिक्षण खेडोपोडी पोहोचले आहे. यातूनच सरपंच देवगिरे आणि राहूल संपतराव काळे  यांनीही विविध उपक्रम केले. सुरवातीला कोबी, फ्लाॅवरचे भाव पडले. तेव्हा शेतात जनावरे सोडल्याच्या बातम्या आल्या. देवगिरे यांनी मात्र परिसरातील शेतकःयांना समजावले. सर्व कोबी- फ्लाॅवर एकत्र करुन स्वखर्चाने नाशिक रोडला आणला. लाॅकडाऊनमुळे अडचणीत असलेल्या नागरीकांना त्याचे मोफत वाटप केले. पोलिस, लष्कर देशासाठी कार्यरत असते. त्यांना कृतीशील पाठींबा म्हणून त्यानी पोलिस कल्याण निधीला मदत दिली., तसेच नाशिकच्या काॅम्बॅट एवीएशन ट्रेनींग सेंटर (कॅटस) च्या लष्करातील कर्मचाःयांच्या कुटुंबीयांना मोफत भाजीपाला विचरीत केला.  यापुर्वी ते तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष होते. त्यातील कामामुळे गावाला  राज्य शासनाने तीन लाखांचा पुरस्कार दिला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Meenatai Thackeray statue case Update: मोठी बातमी! मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग फेकणाऱ्यास २४ तासांच्या आत अटक; गुन्हाही केला कबूल

Disha Patani’s house firing incident: दिशा पटानीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोन शूटर्सचा अखेर गाझियाबादमध्ये खात्मा!

Nagpur Crime : अपघाताच्या विम्याच्या कागदपत्रासाठी मागितले आठ हजार; उपनिरीक्षक, हेडकॉन्स्टेबल एसीबीचा जाळ्यात

Shital Mahajan : स्पेनमध्ये स्कायडायव्हिंग करून शीतल महाजन यांच्या पंतप्रधानांना शुभेच्छा

INDW vs AUSW: टीम इंडियाच्या नारी शक्तीचा ऐतिहासिक विजय! ऑस्ट्रेलियाचा वन डे क्रिकेट इतिहासात असा पराभव कुणी केलाच नव्हता...

SCROLL FOR NEXT