vishwnp video 123.png 
नाशिक

VIDEO : "बाहेर कोरोनाचा विषाणू..पण चार भिंतीत दडलेल्या 'या' हिंसाचाररुपी विषाणूचे काय?" - विश्वास नांगरे पाटलांचा व्हिडीओ व्हायरल

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : कोरोना आणि त्यामुळे सुरु झालेल्या लॉकडाऊनच्या काळात वाढलेला महिलांवरील घरगुती हिंसाचार वाढत असल्याच्या घटना आजकाल ऐकायला किंवा वाचायला मिळत आहेत. खरंतर या अशा गोष्टी कोरोना येण्याच्या आधीही होत होत्याच. काही महिला घर सोडून जाण्याचा प्रयत्नही करत. माहेरी जाऊन राहत. पण कोरोनाच्या साथीमुळे काही महिलांना घरीच थांबून, नवऱ्याचा अत्याचार सक्तीने सोसावा लागतोय. जाणार तरी कुठे? तोंड दाबून बुक्क्यांचा मार! पण महिलांनो आता घाबरण्याची अजिबात गरज नाही..कारण नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून कौटुंबिक हिंसाचार होत असेल तर काय करायचं याबद्दल मार्गदर्शन केले आहे.

लॉकडाऊनच्या काळात महिलांवर अत्याचार

कोरोनाच्या या काळात महिलांवर केला जाणारा हिंसाचार, हा फक्त अशिक्षितांमध्ये नाही तर सुशिक्षितांमध्येही तेवढ्याच प्रमाणात बघायला मिळतोय. मग ती रोजंदारीवर काम करणारी लोकं असो, खरंतर, अनेक महिलांना घराच्या चार भिंतींच्या आत घुसमट, हिंसाचार नेहमीच सोसावा लागतो, मात्र लॉकडाऊनमध्ये हे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे.

महिलांनी स्वतःहून पुढे येणे गरजेचे

हे सगळं थांबवायचं असेल, तर सगळ्यात आधी महिलांनी स्वतःहून पुढे येऊन त्यांच्यावर होणाऱ्या हिंसाचाराच्या तक्रारी नोंदवाव्या लागतील. आजही महिलांना त्यांच्यावर हिंसाचार होतोय हे कळत नाही. अनेक घरांत नवऱ्याने मारलेली एक थोबाडीत म्हणजे हिंसाचारच आहे, हेच कित्येक जणींना कळत नाही. एक थोबाडीत ही हिंसाचाराची सुरुवात आहे, हे जेव्हा महिलांना कळेल आणि पटेल, तेव्हा बदलाची सुरुवात होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सरकारने माझ्या मागण्या मान्य केल्या, ३० दिवसांचा रिचार्ज, डेटाशिवाय प्लान मिळणार; राघव चड्ढांची पोस्ट

IND vs WI 1st ODI Live: जॉन कॅम्बेल-जस्टीन ग्रीव्ह्स जोडीने इतिहास घडवला; १७ वर्षांनंतर विंडीजच्या ओपनर्सनी मोठा पराक्रम केला

Ashutosh Ranka Detained : गुवाहाटीत आशुतोष रांका ताब्यात; हिमंता बिस्वा सरमांवर अभिजीत दीपकेंचा गंभीर आरोप, दिला मोठा इशारा

Dhananjay Munde: दुष्काळाने पिके हातची गेली; धनंजय मुंडेंची शेतकऱ्यांच्या बांधावर धाव, तातडीच्या मदतीचा मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षक पेपरफुटीप्रकरणी मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT