vishwas-nangre-patil-nashik 1234.jpg 
नाशिक

विश्‍वास नांगरे-पाटीलांनी वाढविले आरोग्यसेवेचे मनोधैर्य ..प्रत्यक्ष भेट देऊन केले कौतुक

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : आरोग्य विभागातील डॉक्‍टर, आरोग्यसेवक कोरोनाशी थेट सामना करीत आहेत. प्रत्यक्ष सामना असल्याने त्यांचा जीव अधिक धोक्‍यात आहे. त्यामुळे कोरोनाबाधित, संशयितांवर उपचार करणाऱ्या आरोग्य विभागातील या वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढविण्यासाठी पोलिस आयुक्त विश्‍वास नांगरे-पाटील यांनी जिल्हा रुग्णालयास भेट देऊन त्यांच्या कार्याला सलाम केला. 

संवाद साधत त्यांच्या कामकाजाची माहिती करून घेतली
सहा आठवड्यांपासून शहरात लॉकडाउन आहे. त्यातच नाशिक शहर व जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा शंभरीपार गेला आहे. त्यामुळे अशा बिकट परिस्थितीत जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली वैद्यकीय अधिकारी, अधिसेविका, परिचारिका, वॉर्ड बॉय, चतुर्थश्रेणी कर्मचारी असे सारे आरोग्यसेवक अहोरात्र सेवा देत आहेत. पोलिस आयुक्त विश्‍वास नांगरे-पाटील यांनी थेट जिल्हा रुग्णालयाला भेट देत, रुग्णांची सेवा देणारे वैद्यकीय अधिकारी, आरोग्यसेवक यांच्याशी संवाद साधत त्यांच्या कामकाजाची माहिती करून घेतली.

कामकाजाचे कौतुक करीत त्यांचे मनोबल वाढविले

या वेळी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निखिल सैंदाणे, डॉ. संजय गांगुर्डे, मुख्य प्रशासकीय अधिकारी व्ही. डी. पाटील यांनीही कोरोना कक्षासह जिल्हा रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांवर सुरू असलेल्या उपचारांची माहिती दिली. नांगरे-पाटील यांनी सिव्हिलमधील वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या कामकाजाचे कौतुक करीत त्यांचे मनोबल वाढविले. त्यांच्या कामकाजासाठी प्रशस्तिपत्रही प्रदान केले. या वेळी उपायुक्त अमोल तांबे यांच्यासह पोलिस अधिकारी, जिल्हा रुग्णालयातील कर्मचारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-Israel War: होर्मुजच्या समुद्रधुनीत भारत इराणविरुद्ध युद्धनौका तैनात करणार? ट्रम्प यांच्या आवाहनावर परराष्ट्र मंत्रालयाने दिलं उत्तर

Pune News: सुरक्षारक्षकाच्‍या सतर्कतेमुळे युवती सुखरूप परतली घरी; युवती रात्रभर अंधारात, अन् खडकवासला धरण परिसरात काय घडलं!

Pune Pollution: प्रदूषण रोखण्याची घोषणा हवेतच! पुणे महापालिकेला बांधकाम प्रकल्पांवर सेन्सर बसविण्याचा विसर, धूलिकणांचा आरोग्यावर गंभीर परिणाम..

Javali politics: जावळीच्या राजकारणात शिवेंद्रसिंहराजेच'धुरंधर'; दोन्ही पदांवर भाजपचाच झेंडा, राष्ट्रवादीच्या शिल्पा शिंदे तटस्थ!

Latest Marathi Update: DRDO चे माजी शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर जासूसी प्रकरण

SCROLL FOR NEXT