ZP Nashik latest marathi news esakal
नाशिक

Nashik : ZP कर्मचारी तुपाशी विद्यार्थी मात्र उपाशी! क्रीडा स्पर्धांच्या डामडौलात हरविला विद्यार्थ्यांचा आवाज

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : जिल्हा परिषद कर्मचारी वर्गाच्या झालेल्या क्रीडा स्पर्धांना मोठा डामडौल होता. अगदी घोडे देखील आणण्यात आले होते. मात्र, जिल्हा परिषदेच्याच शाळांमधील विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धांना पुरेशी व्यवस्था देखील नव्हती.

शिवाजी स्टेडिअमवर अस्वच्छता, दुर्गंधीचे साम्राज्यात स्पर्धा घेत, तेथेच विद्यार्थ्यांना जेवणाची व्यवस्था केली होती. तर, प्रशासनातील बड्या अधिकाऱ्यांना या स्पर्धांच्या उदघाटनास जाण्यास देखील वेळ नव्हता. दरम्यान, या स्पर्धांचा मंगळवारी (ता.१४) समारोप होत आहे. (voice of students lost in hustle and bustle of zp sports competition Nashik news)

गत तीन महिन्यांपासून जिल्हा परिषद प्रशासनाला अध्यक्ष चषक सामन्यांच्या अंतिम स्पर्धांना तारीख देण्यासाठी वेळ नव्हता. याबाबतचे ‘सकाळ’ मध्ये झळकल्यानंतर, घाईघाईत प्रशासनाने स्पर्धांची तारीख घोषित केली.

कर्मचारी स्पर्धांसाठी जिल्हा परिषदेतील सारी यंत्रणा धावत असताना, चषकासाठी केवळ शिक्षण विभाग धावत होता. सोमवारी (ता.१३) जिल्हा परिषद शिक्षण विभागातर्फे आयोजित जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धाचे उदघाटन अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी अजुर्न गुंडे यांनी फुगे आकाशात सोडून केले.

मात्र, येथील मैदानावर विद्यार्थ्यांसाठी कोणतीच व्यवस्था नसल्याचे दिसून आले. प्रशासनाने या ठिकाणी भोजन व्यवस्थेत कोणतीही खबरदारी घेतलेली दिसली नाही. जेवणाची ताटे धुण्याची ठिकाणी विद्यार्थ्यांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती.

या अस्वच्छ, दुर्गंधीतच ग्रामीण भागातून आलेले विद्यार्थी भर उन्हात घालण्यात आलेल्या अगदी छोटयांशी मंडपात जेवण घेत होते. पिण्याच्या पाण्यासाठी टँकर होता. परंतू, त्यास गळती लागली होती. त्यामुळे परिसरात चिखलाचे साम्राज्य पसरले होते.

यामुळे या नियोजनावर खेळाडूंना घेऊन आलेल्या शिक्षकांची नाराजी व्यक्त केली आहे. गत आठवड्यातच याच मैदानावर कर्मचाऱ्यांच्या क्रीडा स्पर्धा झाल्या. यात प्रशासन प्रमुख अन अधिकारी असल्याने अगदी नियोजन केले होते. मात्र, विद्यार्थी स्पर्धांसाठी नियोजन करण्याकडे दुर्लक्ष झालेले दिसत होते.

सोमवारपासून दोन दिवस चालणाऱ्या या स्पर्धांच्या अंतिम फेरीमध्ये विजय मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा दुसऱ्या दिवशी समारोपाच्या कार्यक्रमात बक्षिस वितरण करण्यात येणार आहे. एकूण १५ स्पर्धांपैकी १२ स्पर्धा या सोमवारी होत आहेत.

गर्दी होऊ नये यासाठी वक्तृत्व, चित्रकला, बुद्धीबळ, स्पेलिंग बी, रांगोळी, नवोक्रम स्पर्धा या शासकीय कन्या विद्यालय, वैयक्तिक गीत स्पर्धा सारडा कन्या विद्यालय तर समूह नृत्य, वैयक्तिक नृत्य, समूह गीत, खो-खो, कब्बड्डी या स्पर्धा मैदानात होत आहेत.

हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

चार हजार विद्यार्थ्यांचा सहभाग

जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांचे चार हजार विद्यार्थ्यांचा या स्पर्धांमध्ये सहभाग आहे. नाशिक तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा लाडची येथील बँड पथकाने सर्वप्रथम पथसंचलन करून सलामी दिली, यानंतर सर्व तालुक्यांतील पथकांनी पथसंचलन केले.

यानंतर स्पर्धांना सुरवात झाली. सांस्कृतिक स्पर्धांमध्ये वैयक्तिक व सामूहिक नृत्य, वक्तृत्व, वैयक्तिक व सामूहिक गायन, कला स्पर्धांमध्ये चित्रकला, रांगोळी तर क्रीडा स्पर्धांमध्ये खो खो, कबड्डी, धावणे या स्पर्धा घेण्यात येणार आहेत.

यावेळी शिक्षणाधिकारी भगवान फुलारी, गट शिक्षणाधिकारी भास्कर कनोज, मिता चौधरी, नीलेश पाटील, प्रभारी उपशिक्षणाधिकारी धनंजय कोळी आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT