crime News sakal
नाशिक

Nashik Crime News : कामात हलगर्जीपणाचा जाब विचारल्याने महिला डॉक्टरवर वॉर्डबॉयचा प्राणघातक हल्ला!

नरेश हाळणोर

नाशिक : रुग्णांना पुरविण्यात येणाऱ्या सुविधांबाबत तक्रारी आल्याने त्याचा जाब विचारल्याच्या रागातून संशयित वॉर्डबॉयने हॉस्पिटलमधील महिला डॉक्टरवर कात्रीने वार करून प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली. याप्रकरणी संशयित वॉर्डबॉय अनिकेत डोंगरे (रा. संत कबीरनगर, भोसला स्कुलच्या मागे, नाशिक) यास गंगापूर पोलिसांनी अटक केली आहे.

याप्रकरणी गंगापूर पोलिसात प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, गंभीररित्या जखमी महिला डॉ. सोनल अविनाश दराडे यांच्यावर तात्काळ उपचार करण्यात आल्याने त्यांची प्रकृती स्थिर आहे. गंगापूर रोडवरील नामांकित हॉस्पिटलमध्ये सदरील घटना घडली. (Wardboy assaulted woman doctor for asking for laxity in work Nashik Crime News)

सुकदेव नामदेव आव्हाड (रा. शांतिनिकेतन कॉलनी, प्रसाद मंगल कार्यालयाजवळ, गंगापूर रोड) यांच्या फिर्यादीनुसार, गंगापूर रोडवरील केबीटी चौकात खासगी नामांकित हॉस्पिटलमध्ये आव्हाड यांच्या भगिनी डॉ. सोनल दराडे या कार्यरत आहेत. हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णांना वॉर्डबॉय मार्फत सेवा पुरविल्या जातात. मात्र संशयित अनिकेत डोंगरे याच्याबाबत काही रुग्णांनी तक्रारी करण्यात आल्या होत्या. या तक्रारींची गंभीर दखल डॉ. सोनल दराडे यांनी केली.

त्याबाबत त्यांनी दुपारी वॉडबॉय डोंगरे यास बोलावून घेत त्याच्या कामातील हलगर्जीपणाबाबत विचारणा करीत जाब विचारला. त्याचा राग मनात धरून संशयित डोंगरे याने रात्री डॉ. सोनल दराडे यांच्या केबिनमध्ये शिरला आणि पाठीमागून मानेवर कात्रीने वार केला. तसेच पोटात उजव्या बाजुला कात्री खुपसली. यामध्ये डॉ. सोनल या गंभीररित्या जखमी झाल्या. तसेच मोठयाप्रमाणात रक्तस्त्राव झाला. त्यांना तात्काळ ऑपरेशन थिएटरमध्ये नेऊन वैद्यकीय उपचार करण्यात आले.

हेही वाचा : जोखीममुक्त व्यवहारांसाठी रिझर्व बँकेचा 'डिजिटल रुपया'

दरम्यान हॉस्पिटल प्रशासनाकडून याबाबतची माहिती तात्काळ डॉ. सोनल यांचे भाऊ सुकदेव आव्हाड यांना देण्यात आली. त्यांनी घटनास्थळी पोहोचून घटनेची माहिती घेतली. यावेळी उपस्थित नर्सेस व डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार आव्हाड यांनी गंगापूर पोलिसात फिर्याद दिली.

त्यानुसार गंगापूर पोलिस ठाण्यात प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयित अनिकेत डोंगरे यास अटक करण्यात आली आहे. सदरील गुन्ह्याचा तपास सहायक निरीक्षक नितीन पवार हे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT