water crisis news esakal
नाशिक

Water Crisis : धरणात मुबलक; नळाला थेंबथेंब पाणी

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : गत तीन महिन्यांपासून धो- धो बसरणाऱ्या पावसाने शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूरसह अन्य धरणे भरलेली आहेत. मात्र याही परिस्थितीत पंचवटीतील गणेशवाडी भागात अतिशय कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू असल्याने सणावाराच्या काळात महिला वर्ग त्रस्त आहे. विशेष म्हणजे या भागात सकाळचा पाणीपुरवठा भल्या पहाटे केला जातो, तो सकाळी सहा ते आठ करावा अशी मागणी आहे.

पंचवटीतील गणेशवाडी हा संमिश्र लोकवस्तीचा भाग आहे. हा भाग उंचसखल असल्याने खोलगट भागात अधिक दाबाने व जादावेळ पाणीपुरवठा होतो, परंतु उंच भागात पाणीच पोहचत नसल्याने महिला वर्गाला हंडा दोन हंडे पाण्यासाठी अक्षरश: कसरत करावी लागते. त्यामुळे अनेक महिलांना इतर ठिकाणहून पाणी मिळवावे लागते. सध्या या भागात पहाटे साडेचार पावणेपाचलाच नळाला पाणी सोडले जाते. अनेकवेळा साडेसहा वाजता पाणीपुरवठा बंद होतो, त्याऐवजी सकाळी सहा ते आठ या वेळेत पाणीपुरवठा करावा, अशी मागणी आहे. (Water Crisis in panchavati area Nashik Latest Marathi News)

नळाला चक्क गटारीचे पाणी

गत महिन्यात या भागातील अनेक ठिकाणच्या नळाला चक्क गटारीचे पाणी येत होते. येथील महिलांनी याबाबत पाणीपुरवठा विभागाशी संपर्क साधल्यावर व मोठी ओरड झाल्यावर दूषित पाणीपुरवठा बंद झाला, मात्र अद्यापही अनेक भागात सुरवातीला मोठ्या प्रमाणावर गढूळ पाणी येत असल्याच्या महिलावर्गाच्या तक्रारी आहेत. आता गढूळ पाण्याची तक्रार कमी झाली तर नळाला पुरेसे पाणी येत नसल्याच्या तक्रारीत वाढ झाली आहे.

"गणेशवाडीत गत अनेक दिवस गढूळ व दूषित पाणीपुरवठा सुरू होता. आता चांगले पाणी येत असताना योग्य दाबाने पाणीपुरवठा व्हावा." - संगीता सूर्यवंशी, गृहिणी

"या भागात गेल्या कित्येक दिवसांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू आहे. एकीकडे सर्वच धरणे फुल्ल असताना पूर्ण क्षमेतेने पाणीपुरवठा व्हावा." - अर्चना पगारे, सहजीवननगर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: सूर्यकुमारने UAE चा फलंदाज आऊट असतानाही फलंदाजीला परत का बोलावलं? जाणून घ्या नेमकं प्रकरण

KP Sharma Oli reaction : नेपाळमध्ये 'GEN-Z'च्या हिंसक आंदोलनामुळे पंतप्रधानपद सोडावं लागलेल्या ओली यांनी अखेर मौन सोडलं, म्हणाले...

उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचा मोठा निर्णय! सबळ कारणाशिवाय पोलिसांनी केलेली अटक बेकायदेशीर; आरोपीस ताबडतोब मुक्त करण्याचा आदेश

Asia Cup, IND vs UAE: ५ षटकार अन् ४ चौकार... भारताचा फक्त २७ चेंडूत विजय! युएईला दिला धोबीपछाड

Marathi Sahitya Sammelan : साताऱ्यातील संमेलनाला एक कोटी अतिरिक्त निधी, मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची घोषणा; बोधचिन्हाचे अनावरण

SCROLL FOR NEXT