Protest esakal
नाशिक

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गाच्या आराखड्यामुळे पावसाचे पाणी शेतात...; शेतकऱ्यांचे तहसीलसमोर उपोषण

सकाळ वृत्तसेवा

इगतपुरी शहर : भाजप सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गात इगतपुरी तालुक्यात करण्यात आलेल्या चुकीच्या आराखड्यामुळे पावसाळ्यात चार महिने शेतात पाणी साचल्याने शेत पिकांचे मोठे नुकसान झाले. याची नुकसान भरपाई मिळावी म्हणून येथील ग्रामस्थांनी तहसील कार्यालयासमोर साखळी उपोषणास सुरवात केली. अखेर आमदार हिरामण खोसकर यांनी या प्रकरणात मध्यस्थी करत संबंधित यंत्रणेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करत हा प्रश्‍न सोडविण्याचे आश्‍वासन ग्रामस्थांना दिले.

मुंबई-नागपूर समृद्धी मार्गाचे काम प्रगतिपथावर आहे. इगतपुरी तालुक्यातील नांदगावसदो परिसरात समृद्धी महामार्गाचे काम सुरू आहे. या महामार्गाचे काम सुरु असताना एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांनी पुलांची कामे करताना चुकीचा आराखडा तयार केला. याठिकाणी काम करत असताना एमएसआरडीसी अधिकारींच्या चुकीचा आराखडा केल्याने ऐन पावसाळ्यात शेतकऱ्यांचे भात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पावसाळ्यात याठिकाणी भरपूर पाऊस पडतो.

हेही वाचा : मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

महामार्गाचे काम करत असताना पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी योग्य नियोजन केले नाही. तसेच आहे ते नैसर्गिक असलेले नाले ओढे अधिकाऱ्यांनी बुजविले. तालुक्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला. परंतु पाण्याचा निचरा होण्यासाठी कुठलीच व्यवस्था केली नसल्याने तब्बल चार महिने येथील शेतकऱ्यांच्या शेतात पाणी तसेच साचून राहिले. यामुळे शेतकऱ्यांच्या भात पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

या बाबत शेतकऱ्यांनी एमएसआरडीसीच्या अधिकारी यांना निवेदने देऊन सुद्धा या अधिकाऱ्यांनी कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही म्हणून सर्व शेतकऱ्यांनी नांदगांवसदो येथील मच्छींद्र भगत यांच्या नेतृत्वाखाली साखळी उपोषणास सुरवात केली होती. अखेर आमदार हिरामण खोसकर यांनी मध्यस्थी करत उपोषण स्थळी भेट दिली. तसेच स्वतः जागेवर जाऊन प्रत्यक्षात अधिकारी व ग्रामस्थांसमवेत जात पाहणी करून उपोषणकर्त्या शेतकऱ्यांच्या सर्वच मागण्या एमएसआरडीसीचे अधिकारी रियाज पच्चापुरे यांच्याशी चर्चा करून मान्य करून घेतले. त्यानंतर ग्रामस्थांनी आपले उपोषण मागे घेतले.

एमएसआरडीसीचे अधिकारी रियाज पच्चापुरे, तहसीलदार परमेश्वर कासुळे, एस. बोरसे यांच्यासह माजी आमदार पांडुरंग गांगड, प्रशांत कड्ड, रमेश जाधव, पांड्डरंग शिंदे, भगवान आडोळे, माजी प. स. सदस्य नंदलाल भागडे, नारायण वळकंदे, अरुण भागडे, दशरथ भागडे, योगेश भागडे, अनिल भोपे, धनराज म्हसणे, नितीन गुळवे, उपोषणकर्ते बाळा दुभाषे, सदाशिव भागडे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Police: पुण्यात पोलिसांचा धाक उरलाय की नाही? मद्यपींकडून पोलिसांनाच धक्काबुक्की

Latest Marathi News Live Update : द्राक्षबागेची बिकट अवस्था पाहून उगाव येथील प्रगतिशील शेतकऱ्याची आत्महत्या

Air India Flight: दिल्लीकडे येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात अचानक बिघाड; मंगोलियात इमर्जन्सी लँडिंग

Women's World Cup: पाकिस्तानची जर्सी घालून भारतीय संघाला वर्ल्ड कप जिंकण्यासाठी फुल सपोर्ट; चाहत्याचा Video Viral

Mumbai Airport: महत्त्वाची बातमी! मुंबई विमानतळाच्या दोन्ही धावपट्ट्या बंद राहणार; का अन् कधी? जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT