water of Phulenagar lake has reached the benefit area nashik sakal news 
नाशिक

वीस वर्षांनंतर लाभक्षेत्रात खेळले पाणी; कालवा प्रवाहित झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान 

अजित देसाई

नाशिक/सिन्नर : यंदाचा पावसाळा तालुक्याच्या पूर्व भागासाठी सुखकर ठरला आहे. १५ वर्षांनंतर २६० हेक्टर शेतीक्षेत्र ओलिताखाली आणणारा फुलेनगर येथील साठवण तलाव ओव्हरफ्लो झाल्याने २० वर्षांनंतर पहिल्यांदा तलावावरील कालवा प्रवाहित झाला आहे. त्यामुळे आमदार माणिकराव कोकाटे यांच्या पुढाकारातून या कालव्याद्वारे लाभक्षेत्रात पाणी देण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. 

२६० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली

फुलेनगर येथील साठवण तलावातील पाण्यावर वावी, फुलेनगर भागातील शेतकरी शेती पिकवत आहेत. भोजापूर धरणाच्या पूरपाण्यावर हा तलाव भरून घेण्याचे नियोजन असते. मात्र अपवादानेच भोजापूरच्या पाण्याचा लाभ झालेला आहे. धरणातून निघणाऱ्या कालव्यावर २६० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येत असले तरी गेल्या २० वर्षांत एकदाही या कालव्यातून पाणी फिरले नाही. 
१५ वर्षांनंतर यंदाच्या हंगामात मॉन्सूनची मेहेरबानी झाल्यामुळे महिनाभरापासून तलाव ओव्हरफ्लो झाला. तलवातील जास्तीचे पाणी जामनदीतून गोदावरीला मिळाले. या पाण्याने वावी, पिंपरवाडी परिसरातील खारी नाल्यातील बंधारे भरून घेण्याची मागणी शेतकऱ्यांनी आमदार माणिकराव कोकाटे यांच्याकडे केली होती. कोकाटे यांनी फुलेनगर सिंचन कालवा कार्यान्वित करून त्याद्वारे लाभक्षेत्रात पाणी द्यावे यासाठी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना निर्देश दिले. 

बाजार समितीचे माजी सभापती विठ्ठलराजे भोसले, बबन ताजणे, विजय सोमाणी, दिलीप गलांडे, दीपक वेलजाळी, दिलीप वेलजाळी, नामदेव वेलजाळी, महेश खाटेकर, संतोष उगले, ज्ञानेश्वर खाटेकर, अमोल ताजणे, गोविंद गोसावी, राजेंद्र नवले, विलास सच्चे, खंडेराव पठाडे, राजू भरीतकर, नितीन अत्रे आदींसह परिसरातील शेतकऱ्यांनी यासाठी परिश्रम घेतले. 
 
वीस वर्षांनंतर लाभक्षेत्रात पाणी 

समृद्धी महामार्गाचे काम करणाऱ्या दिलीप बिल्डकॉन कंपनीने पहिल्या दिवशी जेसीबी दिला. तर पुढचे तीन दिवस जलसंपदा विभागाने यंत्र उपलब्ध करून देत ठिकठिकाणी बुजलेला कालवा उकरून घेतला. समृद्धी महामार्ग छेदणाऱ्या ठिकाणीदेखील दिलीप बिल्डकॉनने आपली यंत्रणा उपलब्ध करून देत पाण्याच्या मार्गातील अडथळे दूर केले. त्यामुळे २० वर्षांनंतर पहिल्यांदा फुलेनगरचे पाणी लाभक्षेत्रात पोचले आहे. 

फुलेनगर तलाव पूर्ण भरल्यावर परिसरातील शेतीसाठी पुढची चार वर्षे पाणी उपलब्ध असते. समृद्धी महामार्गासाठी खोदकाम करण्यात आल्याने तलावात साठा वाढला आहे. २० वर्षांनंतर कालवा प्रवाहित झाला आहे. भविष्यातील गरज ओळखून या कालव्याची कायमस्वरूपी दुरुस्ती व्हावी. 
-विलास पठाडे, ग्रामविकास मंडळ, वावी 

सिन्नरचा शेतकरी केवळ पाण्याअभावी मागे पडला आहे. मुबलक पाणी असेल तर शेतकरी चिरंतन प्रगती साधतील हे ओळखून आमदार कोकाटे यांनी तालुक्यात सिंचनाच्या सोयी वाढतील याकडे लक्ष केंद्रित केले आहे. वीज, पाणी, दळणवळणाच्या सुविधांसाठी अभ्यासपूर्ण योजना शासनाकडे मांडण्यात आल्या असून, नजीकच्या काळात शेती सिंचनाचा मोठा प्रश्न मार्गी लागेल. 
-सीमंतिनी कोकाटे, जिल्हा परिषद सदस्या 

संपादन - रोहित कणसे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

माेठी बातमी! 'जुन्या थकीत कर्जदारांना दिलासा नाही'; जिल्हा बँकेचा शासनाकडे प्रस्ताव, माेठे अपडेट आले समाेर..

Rishabh Pant record: धडाकेबाज रिषभ पंतने लॉर्ड्सवर रचला इतिहास!, सर विव रिचर्ड्स यांचा 'हा' विक्रम मोडला

Latest Marathi News Updates : पन्हाळगडाचा जागतिक वारसा यादीत समावेश, कोल्हापूरसाठी गौरवाचा क्षण - पालकमंत्री प्रकाश आबिटकर

छत्रपती शिवरायांचा इतिहास जगभर पोहोचणार, UNESCO यादीत पन्हाळगडाचा समावेश; पालकमंत्र्यांनी 'या' घटनेची करुन दिली आठवण

Crime News : नाशिक रोडवरील चोरट्यांनी आर्मी नर्सिंग परीक्षेला आलेल्या उमेदवाराला लुटले; एक लाख पाच हजारांचा ऐवज जप्त

SCROLL FOR NEXT