NMC News esakal
नाशिक

NMC News: शहराचा 2055 पर्यंत पाण्याचा प्रश्न मिटणार; कुंभमेळ्यापूर्वी पाइपलाइन टाकण्याचे काम पूर्ण होणार

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : गंगापूर धरणातून बारा बंगला जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत सिमेंट पाइपलाइन बदलून लोखंडी पाइपलाइन टाकली जाणार असल्याने या माध्यमातून २०५५ पर्यंतच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी पाइपलाइन टाकण्याचे काम पूर्ण केले जाणार आहे.

नाशिक शहराला मुख्यतः गंगापूर धरणातून पाणीपुरवठा होतो. गंगापूर धरणातून पंपिंग स्टेशनद्वारे पाणी उचलले जाते. तिथून बारा बंगला शुद्धीकरण केंद्रापर्यंत जलवाहिनीतून पाणी आणले जाते. (water problem of city solved by 2055 work of laying pipeline completed before Kumbh Mela Nashik News)

१९९७ ते २००० या दरम्यान बाराशे मिलिमीटर व्यासाच्या दोन सिमेंटच्या जलवाहिन्या टाकण्यात आल्या होत्या. त्या माध्यमातून जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पाणी आणून तेथे शुद्ध करून पुढे जलकुंभाच्या माध्यमातून घरोघरी पाणी वितरित केले जाते.

२०२१ मध्ये नाशिक महापालिकेने पाणीपुरवठ्याचा आराखडा तयार केला. त्यात सध्या अस्तित्वात असलेली जलवाहिनी अपुरी असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. त्याचबरोबर सिमेंटची जलवाहिनी असल्याने वारंवार पाणी गळती होऊन पाणीपुरवठा बंद करावा लागतो.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्यामुळे गंगापूर धरण ते बारा बंगला जलशुद्धीकरण केंद्र या दरम्यान ४२५ दशलक्ष लिटर क्षमतेची साडेबारा किलोमीटर लांबीची १८०० मिलिमीटर व्यासाची नवीन लोखंडी जलवाहिनी टाकण्याचा निर्णय महापालिकेने घेतला.

पंधराव्या वित्त आयोगातून निधी

केंद्र सरकारच्या पंधराव्या वित्त आयोगांनी जलवाहिनीसाठी निधी मंजूर केला आहे. प्रकल्पासाठी २०४ कोटी ३८ लाख रुपये खर्च होणार आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने या प्रस्तावाला तांत्रिक मान्यता दिली असून, लवकरच निविदा काढून आम्हाला सुरवात होणार आहे.

दरम्यान, महापालिकेने तयार केलेल्या पाणीपुरवठा आराखड्यानुसार साडेबारा किलोमीटरची जलवाहिनी टाकल्यास २०५५ पर्यंतच्या लोकसंख्येच्या आणि प्रश्न निकाली निघणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Dare Village : गावी आलो किंवा लंडनला गेलो तरी पोटदुखी, “ विरोधकांना कामातून उत्तर देईन”,एकनाथ शिंदेंनी दरेतून साधला निशाणा

रोहित शर्माचा Mumbai Indians मधील 'सहकारी' Ajit Agarkar ची जागा घेणार; आता हिटमॅन २०२७ चा वर्ल्ड कप खेळणारच...

सगळं सोडून द्यायचा विचार होता पण...; सुटकेनंतर संतोष पंडित काय म्हणाले? तुरुंगातल्या व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह

Marathi News Live Updates : UPI व्यवहारांवर शुल्क, व्यापाऱ्यांकडून QR कोड हटवण्याची भूमिका

Panvel News: पनवेलमध्ये वाहतुकीत मोठे बदल! गणरायाच्या विसर्जन मिरवणुकांसाठी प्रशासनाचे कडक पाऊल

SCROLL FOR NEXT