Women and citizens of Dabhadi Shiv Road area while giving a statement to the municipal ward officials.
Women and citizens of Dabhadi Shiv Road area while giving a statement to the municipal ward officials. esakal
नाशिक

Water Crisis : मनपा हद्दीतील शिवरस्ता रहिवाशांना पाणीटंचाई

सकाळ वृत्तसेवा

टेहेरे (जि. नाशिक) : मालेगाव महापालिका हद्दीतील शिवरस्त्याचे काम तातडीने करावे, तसेच दाभाडी शिवारातील रहिवाशांना नियमित व पूर्ण दाबाने पाणीपुरवठा करावा, अशी मागणी या भागातील महिलांसह नागरिकांनी केली आहे. (Water shortage for residents of Shivaratri in malegaon municipal limits nashik news)

हेही वाचा : एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!

दाभाडी शिवारातील रहिवाशांना गेल्या १५ दिवसांपासून पाणीपुरवठा झालेला नाही. महिलांनी महापालिका प्रभाग एक कार्यालयातील अधिकारी श्री. बडगुजर व अभियंता गांगुर्डे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. गेल्या दोन महिन्यांपासून अनियमित पाणीपुरवठा केला जात आहे.

शिवरस्ता व दाभाडी शिवारलगतच्या नागरिकांनी महापालिकेकडून अधिकृत नळकनेक्शन घेतले आहे तरीदेखील नळांना पाणीच येत नाही, अशी वस्तुस्थिती आहे. यासंदर्भात पाणीपुरवठा कर्मचारी योगेश बच्छाव उडवाउडवीची उत्तरे देतात.

अधिकृत नळकनेक्शन घेऊन व पाणीपट्टीचा भरणा करूनदेखील पाणी मिळत नसेल तर यापुढे पाणीपट्टी भरणार नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया तेथील महिलांनी व्यक्त केली. उन्हाळा असल्यामुळे पाण्याचा वापर वाढला आहे. प्रभाग अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन या भागाला सुरळीत पाणीपुरवठा करावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024: देशभरात तिसऱ्या टप्प्यात 61 टक्के, महाराष्ट्रात 54.09 टक्के मतदान

IPL 2024 DC vs RR Live Score: अर्धशतकवीर पोरेलपाठोपाठ ऋषभ पंतही झाला बाद, दिल्लीचा निम्मा संघ परतला माघारी

राज्यसेवेला वर्णनात्मक पॅटर्न २०२५ पासूनच; बदल करण्याचा MPSCचा कुठलाही मानस नाही

Russia : पुतिन यांनी पाचव्यांदा घेतली रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ; आता पेलावी लागणार 'ही' आव्हाने

Latest Marathi News Live Update : PDCC बँकेवर आचारसंहिता भंगप्रकरणी गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT