Water Problem Solve in Nandgaon esakal
नाशिक

Nashik News : नांदगावची पाणी टंचाई होणार दूर

सकाळ वृत्तसेवा

नांदगाव : गिरणा धरणामधून शहरासाठी शाश्वत पर्याय म्हणून बघितल्या जाणाऱ्या "नांदगाव शहर समांतर नळपाणी पुरवठा योजने"ला महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने तांत्रिक मंजुरी दिली आहे.

२०४१ पर्यंत वाढणारी लोकसंख्या गृहीत धरून ६ कोटी लिटर क्षमतेच्या जलशुद्धीकरण केंद्रासह नव्या जलवाहिन्या यासाठी लक्ष्मीनगर व गुरुकृपा नगर येथील प्रत्येकी चार लाख लिटर क्षमतेचे जलकुंभ अशा सुविधा असणारा प्रकल्पीय अहवाल हे या योजनेचे वैशिट्ये असणार आहे. ५५ कोटी रुपयाच्या या प्रकल्पामुळे शहरातील दीर्घकालीन पाणी टंचाईवर मात करणे शक्य होणार आहे. (Water shortage of Nandgaon will be removed Nashik News)

शहरातील पाणी टंचाईवर मात करण्याच्या उद्देशाने गिरणा धरणामधून शहरासाठी शाश्वत पाणी पुरवठा योजना प्रस्तावित करण्यात आली होती. यासाठी आमदार सुहास कांदे यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला होता.

महाराष्ट्र जलजीवन प्राधिकरण विभागाने आता या प्रस्तावाला हिरवा कंदील देत तांत्रिक मंजुरी दिली होती. तांत्रिक मंजुरीच्या टप्प्यानंतर योजनेच्या प्रशासकीय मंजुरीचा टप्पा पार पडल्यावर अंदाजपत्रकीय तरतुदींच्या निविदा सूचना प्रक्रिया सुरु करण्यासाठी पाठपुरावा सुरु झालाआहे.

योजनेसोबत शहरात भूमिगत गटारी योजना कार्यान्वित करण्यात येणार असून त्याचाही प्रकल्पीय अहवाल मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. मुख्य जलवाहिनी, जुन्या टाक्यांची दुरुस्ती, जुन्या जलशुद्धीकरण केंद्राची दुरुस्ती, प्रभागनिहाय वितरण व्यवस्था, धरणावरील नवीन जॅकवेल आदी बाबींचा या प्रकल्पीय अहवालात अंतर्भाव करण्यात आला आहे.

हेही वाचा : जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक

दरम्यान पालिकेच्या हद्दवाढीला जिल्हाधिकाऱ्यांनी हिरवा कंदील दाखविल्यानंतर संभाव्य हद्दवाढीतील लोकसंख्या व भौगलिक रचना लक्षात घेत या समांतर योजनेत सहा ऐवजी साडेआठ एमएलडी पर्यंत जलसाठ्यातील वाढ होणे अपेक्षित आहे. गेल्या दोन महिण्यापूर्वी शहरवासीयांसाठी गिरणा धरणातून दरडोई दर मानसी १३५ या गृहीतका नुसार गिरणा धरणातील पाण्याचे आरक्षण मंजूर झाले होते. आता त्यानंतरच्या प्रशासकीय मंजुरी साठीच्या फायलींचा प्रवास सुरु झाला होत. नगरोत्थान या योजनेतून नांदगाव शहरासाठी पाणीपुरवठा योजना तयार करण्यात आली आहे.

"मनमाडची करंजवण योजना, ७८ खेडी, सुधारित प्रादेशिक नळयोजना, दहिवाळ २५ गावे योजना सारख्या पाणीपुरवठा योजना मार्गी लागल्यानंतर आता नांदगाव शहरासाठी देखील योजना मार्गी लागली. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या सहकार्यामुळे हे शक्य झाले."

- सुहास कांदे, आमदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India's first bullet train : भारताची पहिली बुलेट ट्रेन कधी धावणार?, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी थेट तारीखच सांगितली

Fastag Rules Change: १ फेब्रुवारी पासून बदलणार 'फास्टॅग'चे नियम!, नवीन वर्षात सरकारकडून वाहनचालकांना मिळणार दिलासा

T20 World Cup 2026 च्या सेमीफायनलमध्ये कोणते ४ संघ पोहचणार? हरभजन सिंगची भविष्यवाणी; भारतीय संघाबद्दल म्हणाला...

Bhopal Crime: महिलांची अंतर्वस्त्रे चोरायचा अन् स्वतः घालून झोपायचा; पोलिसांनी काढला माग, धक्कादायक कारण आलं समोर

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT