water supply off latest marathi news esakal
नाशिक

Nashik : शनिवारी संपूर्ण शहरात पाणीपुरवठा बंद

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर व मुकणे धरणातील पंपिंग स्टेशनवर दुरुस्तीची कामे हाती घेतली जाणार असल्याने शनिवारी (ता. २०) संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्याचप्रमाणे रविवारी (ता. २१) सकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने होणार असल्याची माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातर्फे देण्यात आली. (Water supply shut down in entire city on Saturday Nashik Latest Marathi News)

मुकणे धरण येथील पंपिंग स्टेशनच्या जॅकवेलसाठी महावितरण कंपनीच्या गोंदे येथील रेमंड स्टेशनमधील एक्स्प्रेस फीडरवरून वीजपुरवठा केला जातो. या सबस्टेशनमधील दुरुस्तीची कामे हाती घेतली जाणार आहेत. त्यामुळे शनिवारी सकाळी दहा ते दपारी चारपर्यंत पंपिंग स्टेशनला होणारा वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे, तसेच गंगापूर धरणावरील पंप एक स्टेशनमधील दुरुस्तीची कामे हाती घेतली जाणार आहेत.

त्यामुळे शनिवारी सकाळी नऊ ते सायंकाळी सहापर्यंत महापालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रावरून होणारा पाणीपुरवठा बंद ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे शनिवारी संपूर्ण शहराचा सकाळ व सायंकाळचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे, तसेच रविवारी सकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने होईल, असे कळविण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gyanesh Kumar Padma Bhushan : 'ज्ञानेश कुमार यांना पद्मविभूषण पुरस्कार द्या'; भाजप प्रदेशाध्यक्षांनी केली मागणी

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

Latest Marathi News Live Update : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे देशातील 12 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; IMD कडून अलर्ट जारी

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

SCROLL FOR NEXT