Nashik Water News
Nashik Water News esakal
नाशिक

1922 गावांना पाणीपुरवठा; जलजीवन मिशनअंतर्गत जिल्हा परिषदेचे नियोजन

विक्रांत मते

नाशिक : केंद्र सरकारच्या जलजीवन मिशनअंतर्गत (jal Jeevan mission) ‘हर घर नल से जल’ उपक्रमासाठी जिल्हा परिषदेच्या (ZP) पाणीपुरवठा विभागाने एक हजार ५९१, तर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या ३३१ गावांचा समावेश करत एकूण एक हजार ९२२ गावांचा कृती आराखडा तयार केला. वर्षभर दरडोई ५५ लिटर शुद्ध पाणी (Pure Water) प्रत्येक घरापर्यंत नळाद्वारे पुरविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. (Water supply to 1922 villages Planning of Zilla Parishad under Jaljivan Mission Nashik News)

जिल्हाधिकारी गंगाथरन डी. (District Collector Gangadharan D.) यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन बैठक झाली. यात नाशिक जिल्हा परिषदेच्या रेट्रो फिटिंग १२० व नवीन ३३ नळपाणीपुरवठा योजनांना मंजुरी देण्यात आली. २०२२-२३ च्या वार्षिक कृती आराखड्यालादेखील मान्यता देण्यात आली. जिल्हा परिषदेच्या एक हजार ११५ योजनांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली. २०२१ व २२ अखेर ग्रामपंचायतीमार्फत रेट्रो फिटिंगअंतर्गत २०३ गावांना प्रत्येक घरापर्यंत नळजोडणीद्वारे पाणीपुरवठा करण्यात आल्याची माहिती या वेळी देण्यात आली व नवीन असे एकूण ३६० योजनांच्या निविदा जिल्हा परिषदेमार्फत प्रसिद्ध करून त्यांपैकी २५२ योजनांचे कार्यारंभ आदेश देण्यात आल्याची माहिती देण्यात आली.

पाइपचे व स्टील, सिमेंटचे भाव वाढल्याने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने सुधारित केलेल्या दरसूचीमुळे जिल्हा पाणी व स्वच्छता समितीने मंजूर केलेल्या २३७ योजनांना सुधारित प्रशासकीय मान्यता मिळण्यासाठी विभागाने १८७ योजनांचे प्रकल्प अहवाल शासनाकडे मंजुरीसाठी सादर केले आहेत. यापूर्वी दरडोई खर्चाच्या निकषांपेक्षा जास्त अशा ११५ प्रकल्प अहवाल प्रशासकीय मान्यतेसाठी शासनाकडे सादर करण्यात आले होते. त्यांपैकी नऊ योजनांना प्रशासकीय मान्यता शासनाने दिली आहे. जिल्हा परिषदेच्या एक हजार ५९१ योजनांची अंदाजे किंमत एक हजार २९८ कोटी २० लाख आहे. एवढ्या मोठ्या आराखड्याची अंमलबजावणी करण्यासाठी मनुष्यबळ जिल्हा परिषदेकडे नव्हते. त्यामुळे ते २० कनिष्ठ अभियंते कंत्राटी पद्धतीने घेण्यात आले आहेत अशी माहिती बैठकीत देण्यात आली. आराखड्याची अंमलबजावणी करण्यासाठी सध्या उपविभागांची संख्या कमी आहे. त्यामुळे तीन नवीन उपविभागांची मागणी जिल्हा परिषदेमार्फत केली जाणार आहे.

आदिवासी तालुक्यात पाणीयोजना
घरोघरी नळाद्वारे पाणीपुरवठा करण्याचे उद्दिष्ट साध्य करताना जिल्हा परिषदेने मुख्यता आदिवासी तालुक्यातील गावाकडे लक्ष वेधले आहे. कळवण, इगतपुरी, त्र्यंबकेश्‍वर, पेठ, सुरगाणा, बागलाण, नाशिक व दिंडोरी तालुक्यातील सर्व गावे व पाड्यांसह सुधारणात्मक पुनर्जोडणी व नवीन योजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. ५२२ योजनांमध्ये प्रामुख्याने इगतपुरी तालुक्यात १०२, कळवण तालुक्यात १०८, त्र्यंबकेश्वर तालुक्यात २५, दिंडोरी तालुक्यात ७९, पेठ तालुक्यात ३१, सुरगाणा तालुक्यात १०३ व बागलाण तालुक्यात ६६ योजनांचा समावेश करण्यात आला आहे.

"एक हजार ९२२ गावांना व त्या गावांतील प्रत्येक नागरिकाला ३६५ दिवस प्रत्येकी ५५ लिटर शुद्ध पाणी नळाद्वारे पुरविण्याचे उद्दिष्ट आहे. ९६२ योजनांना यापूर्वी प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून, सद्यःस्थितीत पाणीपुरवठ्यासंदर्भात पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे."
-लीना बनसोड, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नाशिक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha election 2024 Results : भारतातल्या लोकसभा निकालावर चीनची प्रतिक्रिया; ''जर मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर...''

Bollywood Actor: माधुरीचा ड्रायव्हर म्हणून केलं काम, पहिल्याच चित्रपटात रेखासोबत इंटिमेट सीन, पण फ्लॉप अभिनेत्याचा लागला टॅग, पण आता...

Lucknow Robbery : चोरी करायला गेला अन्..एसीत झोपला ; लखनऊच्या चोराचा पराक्रम पाहिलात काय?

Crime News: मुंबईच्या IAS आधिकाऱ्याच्या मुलीने उचललं टोकाचं पाऊल; कारण अस्पष्ट

Iran: इराणमध्ये अध्यक्षपदासाठी महिला उमेदवार रिंगणात, पण निवडणुकीआधीच होणार पराभव? कारण काय?

SCROLL FOR NEXT