Mahapareshan Google
नाशिक

महापारेषण कंपनीत नोकरभरतीचा मार्ग मोकळा

विनोद बेदरकर

नाशिक : राज्य वीज मंडळाच्या विभाजनानंतर तयार झालेल्या महापारेषण (mahapareshan) कंपनीतील वर्ग ‘एक’ व ‘चार’ प्रवर्गातील आकृतिबंधात पदोन्नतीतील असमानता दूर करण्यासाठी महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनच्या (Maharashtra State Electricity Workers Federation) पाठपुराव्याला यश आले. ऊर्जामंत्री व सूत्रधारी कंपनीचे अध्यक्ष डॉ. नितीन राऊत यांच्या अध्यक्षतेखाली सूत्रधारी कंपनी संचालक मंडळाची बैठक होऊन त्यात महापारेषण कंपनीच्या नवीन आकृतिबंधास मान्यता देण्यात आली. (way of recruitment in mahapareshan company is cleared out)

चार हजार तंत्रज्ञ भरतीचा मार्ग मोकळा

महापारेषण कंपनीच्या एचआर विभागाने नवीन आकृतिबंध लागू करण्याच्या अनुषंगाने १५ जूनला प्रशासकीय परिपत्रक क्रमांक ३३३६ जारी केले. नव्या आकृतिबंधामुळे साधारण चार हजार तंत्रज्ञ भरतीचा मार्ग मोकळा झाला. वीज कंपनीच्या विभाजनानंतर वर्कर्स फेडरेशनकडून २००७ पासून या विषयावर पाठपुरावा सुरू होता. २०१७ मध्ये सुधारित आकृतिबंध लागू करण्याची प्रक्रिया सुरू केली होती. काही कामगार संघटनांनी कॕटेगरीचा मुद्दा उपस्थित केला. यामुळे अंमलबजावणी रखडली. नंतर महापारेषण प्रशासनाने त्रयस्थ सचिव के. पी. बक्षी यांच्या समितीची स्थापना केली. बक्षी समितीने महापारेषण कंपनी व्यवस्थापनास अहवाल सादर केला.

नवीन आकृतिबंध लागू करावा, या मागणीसाठी प्रकाशगंगा मुख्य कार्यालयासमोर वर्कर्स फेडरेशनने बेमुदत आंदोलन केल्यानंतर ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिवांसमवेत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक होऊन ऊर्जा सचिवांनी महापारेषण कंपनी संचालकांची मान्यता घेऊन राज्य सरकारच्या ऊर्जा विभागास मान्यतेसाठी पूर्ण सुधारणेसह एप्रिल २०२१ मध्ये प्रस्ताव मांडला. आकृतिबंध मंजूर होऊन लागू करण्याची प्रक्रिया सुरू केल्याने लवकरच प्रलंबित चार हजार ५०० तंत्रज्ञ-चारच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा झाला असून, लवकरच पदभरती सुरू होणार आहे. यंत्रचालक प्रवर्गातील कामगारांच्या कामात कोणताही बदल करण्यात येणार नाही. तंत्रज्ञ-चार पदोन्नतीनंतर वर्ग तीनमध्ये जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ: Virat Kohli त्याचे सामनावीर ट्रॉफी कुठे ठेवतो? न्यूझीलंडविरुद्ध पुरस्कार जिंकल्यानंतर सांगून टाकलं

WPL 2026, DC vs GG: १ बॉल अन् ५ धावा... गुजरात जायंट्सने मिळवला थरारक विजय, जेमिमाच्या दिल्लीचा सलग दुसरा पराभव

२०१४पासून अदानीकरण! हे बघून भीती वाटली नाही तर निवडणूक न लढलेली बरी; राज ठाकरेंनी दाखवले VIDEO

Bigg Boss Marathi 6: ९० दिवस, १७ स्पर्धक; पाहा 'बिग बॉस मराठी ६' च्या घरातील स्पर्धकांची यादी

अजित पवारांना लाथ मारून हाकला किंवा माफी मागा, गाडीभर पुरावे कोर्टात द्या; भ्रष्टाचारावरून ठाकरे बंधूंनी फडणवीसांना घेरलं

SCROLL FOR NEXT