Aayush aka Natya's life-changing teacher Bhagwan Wagh, Aayush Kedare with Manilal Bahiram. esakal
नाशिक

Nashik News : शिव्या देणारा ' नट्या ' सुविचार सांगू लागतो तेव्हा...दहिवदच्या शिक्षकांनी साधली किमया

गावात शिव्या देत फिरणारा, कुणालाही दगड मारून पळणारा, वाया गेलेलं पोरग म्हणून ज्याच्या जवळही कुणी थांबत नव्हतं.

हर्षल गांगुर्डे : सकाळ वृत्तसेवा

Nashik News : गावात शिव्या देत फिरणारा, कुणालाही दगड मारून पळणारा, वाया गेलेलं पोरग म्हणून ज्याच्या जवळही कुणी थांबत नव्हतं. तो ‘नट्या’ खणखणीत मराठी वाचू लागलाय. सुविचार बोलू लागलाय. द्वेष नव्हे तर मैत्री जपू लागलाय आणि ही किमया साधली आहे दहिवद तालुका चांदवड येथील जिल्हा परिषद शाळेने अन् तिथल्या गुरुजींनी.

शहरी भागातील खासगी शाळांचे पेव ग्रामीण भागात आले आणि जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या घसरू लागली. (When cursing Natya starts giving advice in Dahiwad teachers achieved alchemy of student nashik news)

मरगळ झटकून अनेक शिक्षकांनी जिल्हा परिषद शाळांत, शिक्षण पद्धतीत असा काही बदल केला की इंग्रजी शाळांच्या दारी रांगेत उभी राहणारी पालक आता जिल्हा परिषद शाळांचे कौतुक करू लागली आहे. याचे कारण आहे नट्या अर्थात आयुष बाळू केदारे सारख्या शेकडो मुलांच्या आयुष्यात झालेला आमूलाग्र बदल.

व्यसन अन् गरिबीत गुरफटलेल्या कुटुंबातील आयुष हा चिमुकला मुलगा. नाव आयुष असल तरी गावात नट्या म्हणून प्रसिद्ध. गावातील काही उनाड पोरांनी नट्याला शिव्या द्यायला प्रोत्साहित केलं. नट्य ला जवळ घेऊन कुटुंबातील कुणी समजून सांगावे अशी कौटुंबिक पार्श्वभूमी देखील नाही. वाह्यात पोरग म्हणून गावाने द्वेष केल्याने त्याच्याही मनी कधी चांगल्या विचारांनी जागा घेतलीच नाही.

२०२१ सालात नट्याचा प्रवेश गावच्या जि. प. शाळेत झाला. प्रेम, मार्गदर्शन, संस्कार या तिन्ही गोष्टींना हे लेकरू पोरक असल्याचे शिक्षक भगवान वाघ यांच्या लक्षात आल. आयुषच दुपारचं जेवण आता वाघ गुरुजींच्या डब्यात सुरू झालं. शेवटच्या बाकावरून तो पहिल्या बाकावर आला. अभ्यासातील त्याच्या थोड्या प्रगतीच शिक्षक मनभरुन कौतुक करू लागले. त्याच्या आजूबाजूच्या परिस्थितीत जाणीवपूर्वक बदल करण्यात आले.

परिणाम म्हणून चौथीत शिकणारा अल्लड नट्या आता प्रेम, मैत्री, आदर, जिव्हाळा ह्या शब्दांच्या भोवती फिरू लागला आहे. हातातील दगडांची जागा पुस्तकाने, शिव्यांची जागा सुविचारांनी, द्वेषाची जागा मैत्रीने घेतली आहे. याच सर्व श्रेय गावकरी, जि. प. शिक्षक भगवान वाघ, मनीलाल बहिरम यांना देत आहे.

फॅन्ड्री चित्रपटात जब्याने व्यवस्थेवर फेकून मारलेला दगड भोवतालच्या हतबलतेचं प्रतीक होता. इथे नट्याच्या हातातील दगडाची जागा पुस्तकांनी घेतली. हे जिल्हा परिषद शाळांचे यशच म्हणावं लागेल. आयुषचा सकारात्मक प्रवास असाच सुरू राहण्यासाठी भोवतालाने देखील त्याच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा. अन्यथा पुस्तकांची जागा पुन्हा दगड घेईल जो भिरकवला जाईल व्यवस्थेच्या तोंडावर हतबलतेतून.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Violence : बाजूलाच सर्किट बेंच, वीज खंडित, प्रचंड गोंधळ, तलवारी, पोती भरून दगडं; अपुरी पोलिस यंत्रणा, कोल्हापुरात दोन गटातील राड्याचा घटनाक्रम असा...

Toll Free Scheme: ‘समृद्धी’वर चाचणीतच कटला ईव्ही वाहनांचा टोल! शासनाची घोषणा ठरली फोल, तांत्रिक अडचणी पाठ सोडेनात

Dhanashree Verma च्या सपोर्टमध्ये उतरली सूर्यकुमार यादवची पत्नी देविशा; म्हणाली, तुझ्या प्रती आदर...! नेटिझन्स म्हणायला लागले....

Latest Marathi News Updates : कोल्हापुरात सध्या तणावपूर्ण शांतता

PMC News : महापालिकेची मिळकतकर थकबाकी वसुलीसाठी कडक पावले; १७ हजार कोटी रुपये अद्याप येणे, महापालिकेकडून विविध उपाययोजनांवर भर

SCROLL FOR NEXT