नाशिक : (येवला) गेल्या वर्षी ९१ टक्के निकाल लागल्याने येवला तालुक्यातील विद्यार्थी अधिकच गुणवान झाल्याचे म्हटले गेले, पण यंदा तालुक्याचा निकाल गत वर्षाच्या तुलनेत ७ टक्क्यांनी घटून ८४.५७ टक्के इतका लागला. त्यामुळे पोरांची हुश्शारी गेली कुठं? असे म्हणण्याची वेळ आली आहे.
२०५ विशेष प्रावीण्यात
यंदा तालुक्यातील ५५४ विद्यार्थ्यांची बत्ती गूल झाली असून परीक्षा काळात काही केंद्रावर भरारी पथकांनी खडा पहारा दिल्याने ही वेळ आल्याचे सांगितले जाते. तर उत्तीर्ण ३ हजार ५३ पैकी एक हजार ८८६ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. तालुक्याचा बारावीचा निकाल २०१७ मध्ये ८१ टक्के व २०१८ मध्ये ९० तर २०१९ मध्ये ९१.१४ टक्के होता. यंदा मात्र यात अनपेक्षितपणे घट झाली आहे. येवला तालुक्यातील २५ कनिष्ठ महाविद्यालयांतून ३ हजार ६१० विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यापैकी २०५ विशेष प्रावीण्य, १ हजार ८८६ प्रथम श्रेणीत, ९४२ द्वितीय श्रेणीत तर २० पास श्रेणीत असे ३ हजार ५३ उत्तीर्ण झाले आहेत.
निकाल नेहमीप्रमाणे दर्जेदार
नेहमीच पहिला क्रमांक सांभाळणाऱ्या शहरातील विद्यालयाशी बरोबरी करत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यानीही बाजी मारली आहे. शहरातील स्वामी मुक्तानंद, एक्झोकेम शाळेने उच्चांकी गुण मिळवले व तालुक्यात पहिला क्रमांक विविध शाखांतून मिळवले आहेत. बाभूळगाव येथील संतोष ज्यू.कॉलेज तसेच अंदरसूल येथील सोनवणे कनिष्ठ महाविद्यालयांचा निकाल नेहमीप्रमाणे दर्जेदार लागला आहे.
असा लागला निकाल...
येवल्यातील स्वामी मुक्तानंद विद्यालयाचा एकूण निकाल ८५.२३ (विज्ञान-९७.८०,कला-५७.६०,वाणिज्य -९२.२५,किमान कौशल्य - ८६.३६),एन्झोकेम विद्यालय ८९.८९ (विज्ञान-९९.६१,कला-६०.५२,वाणिज्य - ९६.७४),जनता विज्ञान विद्यालयाचा ९८.७३ टक्के,कला वाणिज्यचा ७८.४३ (कला-६८.६८,वाणिज्य -९९.२९), अंग्लो उर्दूचा कलेचा ६९.१३,संतोष ज्युनिअरचा एकत्रित ९४.४४ (विज्ञान-९८.३८,कला-७०), एस.एन.डी.महाविद्यालयाचा ८०.६२ (विज्ञान-९०.६९,कला-६०.४६),धानोरा येथील कांचन सुधाचा ९५.९५ (विज्ञान - १००,कला - ८३.३३,वाणिज्य -१००),तर विट्टी विज्ञानाचा १०० टक्के,एरंडगाव येथील स्वामी विवेकानंद विद्यालयाचा ८१.५७, नगरसूल येथील न्यू इंग्लिश स्कूलचा ४३.१८,पाटोदा जनता विद्यालयाचा एकत्रित ९१.४२ (विज्ञान-९६.६०,कला-८५.४७),
हेही वाचा > थरारक! बायकोच्या चारित्र्यावर होता नवऱ्याला संशय...मध्यरात्रीच केला 'असा' अंगावर काटा आणणारा प्रकार
रहाडीच्या संतोष विद्यालयाचा ९५.१४ (विज्ञान-९६.७९,कला-९०) तर जळगाव नेऊरचा १०० टक्के,सावरगाव न्यू इंग्लिश स्कूलचा ३३.८२,नगरसूल किमान कौशल्य स्कूलचा ९१.८३, तर राजापूर येथील माध्यमिक विद्यालयाचा ९८.४२,अंदरसुल येथील मातोश्री सोनवणे विद्यालयाचा ८९.७२ (विज्ञान-१००,कला-६६.७८,वाणिज्य -९०.६२), येवला उर्दूचा ८९.३६,राजापूरच्या गणाधीशचा ९८.४१ (विज्ञान - १००,कला - ९१.६६,वाणिज्य -१००),सायगवाच्या सरस्वती विद्यालयाचा ६१.५३,भाटगावच्या विश्वलताचा ८५ (विज्ञान - ९२.८५, वाणिज्य -६६.६६),अनकाईच्या सोनवणे ज्यू.कॉलेजचा ९१.७६ (विज्ञान - ९७.०५,कला - ७०.५८),पुरणगावच्या आत्मा मलिकचा १०० टक्के निकाल लागला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.