athvde bajar.jpg
athvde bajar.jpg 
नाशिक

'मग गंगाघाटावरील आठवडे बाजारालाच विरोध का?' संतप्त व्यावसायिकांचा मनपाला प्रश्‍न

दत्ता जाधव

नाशिक : (पंचवटी) मुख्यमंत्र्यांनी नियम पाळण्याच्या शर्तीवर बाजार सुरू करण्यास संमती दर्शविली आहे. एकीकडे शहराच्या विविध उपनगरांमध्ये आठवडे बाजार सुरू झाले आहेत. मग गंगाघाटावरील आठवडे बाजारालाच विरोध का? असा संतप्त सवाल आज भाजीविक्रेत्यांनी महापालिका अतिक्रमण विभागासह पोलिसांना विचारत मोहिमेला तीव्र विरोध दर्शविला.


पथक व विक्रेत्यांत मोठा वादविवाद

नगरसेवक शाहु खैरे यांनी व्यावसायिकांच्या बाजूने मध्यस्थी करत अशा प्रकरणात स्थानिक नगरसेवकांना विश्‍वासात घेणे गरजेचे असल्याची आग्रही भुमिका मांडली. गत कित्येक वर्षांपासून गंगाघाटावर दर बुधवारी आठवडे बाजार भरतो. मात्र कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून पोलिस व महापालिका प्रशासनाने मज्जाव केला होता. तेव्हापासून हा बाजार बंदच आहे. गत आठवड्यात काही व्यावसायिकांनी दुकाने लावली होती. मात्र प्रशासनाने त्यावेळी कोणतीही कारवाई केली नव्हती. त्यामुळे आज सकाळी विक्रेते याठिकाणी मोठ्या प्रमाणावर दाखल झाले. या व्यावसायिकांनी दुकाने लावण्यास सुरवात केल्यावर काही वेळातच पोलिसांसह त्याठिकाणी दाखल झालेल्या अतिक्रमणविरोधी पथकाने विक्रेत्यांना व्यवसायाला मज्जाव केला. यावेळी पथक व विक्रेत्यांत मोठा वादविवादही झाला. मात्र उपस्थित पोलिसांनी मध्यस्थी करत वाद मिटविला. 

कोरोनामुळे प्रशासनाचा बाजाराला विरोध

विक्रेते नगरसेवक शाहु खैरे यांच्या संपर्क कार्यालयात पोहोचले अन हे प्रकरण त्यांच्या कानावर घातले. काहीवेळात मनपा पंचवटीचे विभागीय अधिकारी विवेक धांडे हेही याठिकाणी दाखल झाले. त्यांनी कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाचा बाजाराला विरोध असल्याचे सांगितले. दुसरीकडे अतिक्रमणासारखी मोहिम राबविताना प्रशासनाने स्थानिक नगरसेवकांना विश्‍वासात घेणे गरजेचे असल्याचे मत नगरसेवक शाहु खैरे यांनी व्यक्त केले. याबैठकीनंतर काही वेळातच जोरदार पाऊस सुरू झाल्याने विक्रेत्यांनी दुकाने आवरते घेणे पसंत केले. 

महापालिका व पोलिसांनी अतिक्रमणाविरोधात मोहिमा आखत अंमलबजावणी जरूर करावी, परंतु तत्पूर्वी स्थानिक नगरसेवकांना विश्‍वासात घेणे गरजेचे आहे. - नगरसेवक शाहु खैरे 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर मनपा प्रशासनाने सोशल डिस्टंसिंगचे पालन करत व्यवसायास परवानगी दिलेली आहे. आता विक्रेत्यांनी नियमांच्या आधीन राहून विक्री करावी. - विवेक धांडे, पंचवटी विभागीय  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Video : नरेंद्र मोदींनी काढली बाळासाहेब ठाकरेंची आठवण; म्हणाले, डीएमकेचे लोक सनातन धर्माला डेंग्यू म्हणत आहेत...

IPL 2024 DC vs MI Live Score : तिलक वर्माचे अर्धशतक! टीम डेविडचीही फटकेबाजी; मुंबई मिळवणार विक्रमी विजय?

PM Modi Kolhapur Rally: पंतप्रधान मोदींच्या सभेला संभाजी भिडेंची हजेरी; मोदींचं कोल्हापुरकरांना पुन्हा सत्तेत आणण्याचं केलं आवाहन

Tristan Stubbs DC vs MI : 4,4,6,4,4,4 एकाच षटकात होत्याचं नव्हतं झालं! स्टब्सच्या तडाख्यात वूडची शकलं

Latest Marathi News Live Update : पाच वर्षात पाच पंतप्रधान करण्याचा इंडिया आघाडीचा प्लॅन- मोदी

SCROLL FOR NEXT