cheating-gf.jpg 
नाशिक

मला पतीसोबत नाही तुझ्यासोबत राहायचयं..."चल त्याचा काटा काढू"

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : टाकळी (ता. मालेगाव) येथील संदीप नाना खैरनार (वय 32) या तरुणाचा खून दहा दिवसांनंतर उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे शाखा व तालुका पोलिसांना यश आले. पत्नीने पूर्वाश्रमीच्या प्रियकराच्या मदतीने पतीचा खून केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले असून, संशयित पत्नी अर्चना (26) व तिचा प्रियकर विलास जगताप (30, रा. चिखलओहोळ, ता. मालेगाव) यांना बुधवारी (ता. 8) अटक करण्यात आली. 

पत्नी निघाली खलनायिका

संशयित अर्चनाचे माहेर चिखलओहोळ येथील आहे. विवाहापूर्वी महाविद्यालयीन जीवनापासून तिचे विलासशी प्रेमसंबंध होते. विवाहानंतर त्यांच्यात दुरावा निर्माण झाला. विलासची पत्नी मृत झाल्यानंतर नऊ महिन्यांपासून तो अर्चनाच्या संपर्कात होता. यातून त्यांच्यात पुन्हा प्रेमसंबंध प्रस्थापित झाले. संदीप हा वाके फाट्याजवळील साईसुमन पेट्रोलपंपावर कामाला होता. त्याला दारूचे व्यसन होते. दारू प्यायल्यानंतर तो पत्नीला त्रास देत असे. विलास सध्या उत्तमनगर (नाशिक) येथे वास्तव्याला होता. त्याने अर्चनाला भ्रमणध्वनी घेऊन दिला होता. 28 डिसेंबरला संदीपने घरी मटण आणले होते. तो घरी येताच त्याला विलास दिसला. त्यातून तिघांमध्ये बाचाबाची झाली. यात विलास व अर्चनाने संदीपचा दोरीने गळा आवळून खून केला. यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने हातपाय बांधून मृतदेह दुचाकीवर टाकून महामार्गावरील वाके शिवारात टाकळी फाट्याजवळ महादू पवार यांच्या शेतालगत फेकून दिला.

टाकळी येथील घटनेचा दहा दिवसांत उलगडा 

29 डिसेंबरला सकाळी पोलिसांना मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती. मृत संदीपचा भाऊ सचिन खैरनार याच्या तक्रारीवरून तालुका पोलिस ठाण्यात खून करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व मालेगाव तालुका पोलिस ठाण्याच्या पथकाने टाकळी व परिसरात गेले तीन दिवस कसून चौकशी करून हा खून उघडकीस आणला.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Rozgar Mela : उद्या तब्बल ५१,००० तरुणांचे नशीब उजळणार ! पंतप्रधान मोदी युवकांना'ड्रीम जॉब'ची नियुक्तीपत्रे प्रदान करणार

Shirur Firing: शिरूरमध्ये गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गोळीबार; पूर्ववैमनस्यातून बिअर बार चालक तरुणाची हत्या

Student Safety: रिटेवाडी जिल्हा परिषद शाळेत जल जीवन मिशनची अर्धनिर्मित पाण्याची टाकी; विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला गंभीर धोका, ग्रामस्थांची आक्रमक कारवाईची मागणी

Marathi News Live Updates : UPI व्यवहारांवर शुल्क, व्यापाऱ्यांकडून QR कोड हटवण्याची भूमिका

Shirur fake tiger scare: कोंढापुरीत एआयच्या मदतीने बनावट वाघाचा फोटो, अफवा पसरवणाऱ्या युवकाला वनविभागाची समज

SCROLL FOR NEXT