Death esakal
नाशिक

Nashik News: पतीला व्हिडिओ कॉल केल्यानंतर पत्नीची गळफास घेत आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : सामनगाव परिसरातील गाडेकर मळ्यात राहणाऱ्या विवाहितेने पतीला व्हिडिओ कॉल करून ‘मी आत्महत्त्या करीत आहे,’ असे सांगत काही वेळातच गळफास घेत आत्महत्त्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. (Wife commits suicide by hanging herself after making video call to her husband Nashik News)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

मनाली प्रसाद गवळी (३०, रा. आनंद सिटी, गाडेकर मळा, सामनगाव रोड, ) असे मृत विवाहितेचे नाव आहे. मनाली यांनी गेल्या शनिवारी (ता.९) सायंकाळी घरी असताना पती प्रसाद गवळी यांच्या मोबाईलवर व्हिडीओ कॉल केला आणि ‘मी आत्महत्या करत आहे’, असे सांगितले.

कामानिमित्ताने बाहेर असलेल्या पती प्रसाद यांनी तत्काळ मनालीचा मानलेला भाऊ आकाश मोरे (रा. पळसे, राजवाडा) यास फोन करीत घरी जाण्यास सांगितले. आकाशने घरी पोचत दार उघडण्याचा प्रयत्न केला.

मनालीने दरवाजा न उघडल्याने त्याने दरवाज्याच्या फटीतून पाहिले असता मनालीने गळफास घेतल्याचे दिसून आले.याबाबत नाशिकरोड पोलिस ठाण्यात माहिती दिली असता वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री. वांजळे, सहायक निरीक्षक शेळके, उपनिरीक्षक श्री. विंचू आणि हवालदार संतोष पाटील यांनी घटनास्थळी दाखल होत दरवाजाचा कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश करीत मनालीला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. येथे डॉक्टरांनी तीस तपासून मृत घोषित केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidarbha Orange Alert : विदर्भाला ‘ऑरेंज अलर्ट’; राज्यात तीन दिवस पावसाची शक्यता पुणे घाटमाथ्याला ‘यलो अलर्ट’

IND vs NZ T20I Squad: भारत-न्यूझीलंड ट्वेंटी-२० मालिकेसाठी संघ जाहीर; अष्टपैलू खेळाडूची माघार, १५ जणांची तगडी टीम

PITRU PAKSHA 2026 VASTU TIPS: घरात सुख-शांती आणि सकारात्मकता राहिल टिकून! पितृपक्षापूर्वी फक्त 'या' ४ वस्तू बाहेर काढा

Marathi News Live Updates : माथेरान टॉय ट्रेनच्या मार्गावर दरड कोसळली

Ajit Pawar Jay Pawar : अजित पवारांचा 'अजित सृष्टी' देखावा पाहून जय पवारांना रडू आवरलं नाही; ‘आई अजून रडत असते का'?

SCROLL FOR NEXT