Wildlife caught on camera in Rajapur-Mamdapur forest boundary and camera in forest  esakal
नाशिक

Nashik News : राजापूर ममदापूरच्या वनहद्दीत कॅमेऱ्यात कैद झाले वन्यप्राणी; ट्रॅप कॅमेऱ्यातून गणना

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : पावसाळ्यात निसर्गाचा आविष्कार तर उन्हाळ्यात प्रकाश झालेले माळरान अशी टोकाची स्थिती असलेल्या राजापूर,ममदापूसह पूर्व भागातील वनहद्दीतील संपूर्ण जंगलात वन्यप्राण्यांचा वावर वाढत आहे.

वनविभागाने नुकतेच वनहद्दीत लावलेल्या लाइव्ह कॅमेरा,ट्रॅप कॅमेऱ्यात हरणांसह तरस, लांडगे, घुबड,मोर,उदमांजर असे अनेक प्राणी कैद झाले आहेत. (Wild animals are increasing in entire forest area of ​​Rajapur Mamdapur and forest boundary of eastern region nashik news)

या भागात वनविभागाचे साडेसात हजार हेक्टर क्षेत्र असून त्यापैकी साडेपाच हजार हेक्टर क्षेत्रावर वनसंवर्धन राखीव प्रकल्प राबविण्यात आला आहे. यामुळे अनेक कामे होत आहेत, पण या कामामुळे अपेक्षित बदल जंगलात झालेला दिसत नाही.

कडाक्याच्या उन्हामुळे आत्ताही संपूर्ण जंगल भकास झाले असून पाण्यासाठी वन्यजीवांची भटकंती होताना दिसते. अर्थात पिण्याच्या पाण्यासाठी पाणवठे, गवताचे कुरण यामुळे काही प्रमाणात हरणांची सोय होत असल्यामुळे दोन वर्षापासून हरणाचे स्थलांतर थांबल्याचे सांगितले जाते.

पावसाळ्यात सर्वत्र हिरवेगार जंगल, छोटेमोठे बंधारे पाण्याने तुडुंब भरलेले अन खळाळणारे पाणी लक्ष वेधून घेते. अशा निसर्गसंपन्न वातावरणात हरणांचे कळप मनमोहन वाटतात. याचमुळे अनेक पर्यटक देखील येथे हरणे पाहण्यासाठी गर्दी करतात. हरणांसह इतर प्राण्यांची गणना करण्यासाठी बुद्ध पौर्णिमेला ममदापूर संवर्धन वनक्षेत्रामध्ये पाणवठे व विविध ठिकाणी सुमारे ९ ट्रॅप कॅमेरा व लाइव्ह कॅमेरे बसवण्यात आले होते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

भुलेगाव, रहाडी, ममदापूर, पिंपळखुंटे बुद्रूक, राजापूर, सोमठाणजोश, पिंपळखुटे तिसरे, जायदरे, आहेरवाडी, कुसमाडी राखीव वनातील पाण्यावर लाइव्ह कॅमेरा, ट्रॅप कॅमेरा विविध ठिकाणी लावलेल्या कॅमेऱ्यात पाणवठयावर पाणी पिण्यासाठी येणारे वन्यजीव तरस, लांडगे, कोल्हे, काळवीट, खोकड, घुबड, मोर, मुंगूस, उदमांजर इतर वन्यजीव आढळून आले आहे.

यावरून फक्त हरणेच नव्हे तर इतरही वन्यप्राणी या जंगलात असल्याचे स्पष्ट झाले आहे.
राजापूर, ममदापूर परिसर म्हणजे नेहमीच दुष्काळी परिस्थिती असलेला भाग असून कितीही पाऊस झाला तरी मार्च-एप्रिल महिन्यात पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागते.

वन्यजीव देखील टंचाईच्या या दाहकतेत भाजून निघतात. यामुळे वनविभागाला दरवर्षी वनहद्दीतील १५ ते २० वॉटर होलद्वारे पाणीपुरवठा करावा लागतो. यंदा तर कडाक्याचे ऊन असल्याने वन्यजीवांची लिहिलाही होत आहे. यामुळे वॉटर होलमध्ये सातत्याने पाणीपुरवठा करण्याची काळजी वनविभागाला घ्यावी लागणार आहे.

हरणांची संख्या वाढतेय...

राजापूर परिक्षेत्रात २०१६ मध्ये २९७ काळवीट, ६७५ हरिण, ७० पाडस असे एकूण १०४२ हरिण आणि काळविटांची संख्या होती. यात २०१८ मध्ये तब्बल ३७८ ने वाढ झाली आहे. त्यात ६० काळवीट, २२८ हरिण तर ९० पाडस अशी वाढ होत ही संख्या १ हजार ४२० झाली आहे.

तालुक्यातील हरिण आणि काळविटांची संख्या २ हजार ४७५ वर पोहोचली आहे. त्यानंतरचे आकडे वनविभागाकडून उपलब्ध झालेले नाही. मात्र हरणांचा थेट शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत व तालुक्याच्या वेगवेगळ्या भागात असलेला वावर पाहता ही संख्या पाच ते सात हजाराच्या दरम्यान असल्याचाही अंदाज वर्तविला जातो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Changur Baba : अंगठ्या अन् रत्न विकायचा, ५ वर्षात जमवली १०० कोटींची माया; धर्मांतर रॅकेट प्रकरणी अटक केलेला छांगुर बाबा कोण?

बौद्ध धर्मगुरू दलाई लामांना 'भारतरत्न' देण्याची मागणी; 80 खासदारांनी केली पाठिंबा दर्शवणारी स्वाक्षरी, मोदी सरकार घेणार लवकरच निर्णय?

Guru Purnima 2025 Greeting Card: गुरुपौर्णिमेनिमित्त गुरूंसाठी बनवा खास ग्रीटिंग कार्ड, जाणून घ्या सोपी पद्धत

Oxford Graduate: ऑक्सफर्ड विद्यापीठाचा पदवीधर करतोय फूड डिलिव्हरी; दरमहा कमावतोय लाखो रुपये, म्हणाला...

Solapur Crime: निर्दयी मुलाने बापाला चाबकाचे फटके देऊन संपविले, घरात रक्ताचा पाट वाहिला तरी...सोलापूर हादरले !

SCROLL FOR NEXT