chhaganbhujbal3.jpg 
नाशिक

विजयी उमेदवारांनी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्र यावे - छगन भुजबळ

सकाळवृत्तसेवा

नाशिक : राज्यभरात नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल सोमवारी (ता. 18) रोजी जाहीर झाले. या निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठ यश मिळाले आहे.  राज्यातील या ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आलेल्या सर्व विजयी उमेदवारांचे राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी मन:पूर्वक अभिनंदन व्यक्त केले. गावाच्या विकासाच्या दृष्टीने शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच, गावाच्या विकासासाठी पक्षभेद विसरून विजयी आणि पराजय झालेल्या सर्व उमेदवारांनी एकत्र यावे असे आवाहनही त्यांनी केले आहे.

गावाच्या विकासासाठी एकत्र या...

छगन भुजबळ म्हणाले की, लोकशाही व्यवस्थेचा ग्रामपंचायत हा महत्वाचा कणा असून गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी ग्रामपंचायत हे महत्वाचं केंद्र आहे. प्रत्येक ग्रामपंचायत स्वयंपूर्ण झाली तर त्यांचा परिणाम हा राज्याच्या विकासावर होत असतो. नागरिकांना प्राथमिक सुविधा पुरविण्याचे काम ग्रामपंचायतीतून होत असते. त्यामुळे याठिकाणी काम करतांना एकमेकांमधील मनभेद, पक्षभेद बाजूला ठेऊन गावाच्या विकासासाठी एकत्र येण्याची आवश्यकता असते. 

निवडणुकीत महाविकास आघाडीला नागरिकांनी भरभरून असे मतदान केल्याचे बघावयास मिळाले आहे. त्याबद्दल सर्व मतदारांचे आभार मानतो. तसेच, जय व पराजय विसरून सर्वच उमेदवारांनी तसेच नागरिकांनी एकत्र येत गावाचा सर्वांगीण विकास साधावा असे आवाहन मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Budget 2026 : अर्थसंकल्पात विवाहिताना मोठा दिलासा? पती-पत्नीला आता कमी कर भरावा लागणार; नेमका काय फायदा होणार?

Mumbai News: परप्रांतीयांकडून भाजप कार्यकर्त्यांना जबर मारहाण, कुर्ल्यातील घटनेचा व्हिडिओ व्हायरल

Tractor Driver Wins Lottery : ट्रॅक्टर ड्रायव्हरने जिंकली १० कोटींची लॉटरी, एका रात्रीत बदलले नशीब

Latest Marathi News Live Update : भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा पालघर जिल्ह्यात लॉंग मार्च

विधानपरिषदेची मुदत संपताच राजकारणातून निवृत्त होणार, राजकीय परिस्थितीला कंटाळून भाजप आमदाराचा तडकाफडकी निर्णय!

SCROLL FOR NEXT