Winter Season Food esakal
नाशिक

Winter Season Food : थंडीचा महिना...गरम अन् पौष्टिक आहार खा!

अरुण मलानी

नाशिक : थंडीचा महिना...गरम अन खा पौष्टिक आहार ! हिवाळ्यात उचित आहार ठेवल्‍यास वर्षभर चांगले आरोग्‍य जपता येऊ शकते, असे आरोग्य तज्ज्ञ सांगतात. सुकामेव्‍यासह स्निग्‍ध पदार्थ, उष्ण पदार्थ अन्‌ तीक्ष्ण पदार्थांचा आहारात समावेश करण्याचे आयुर्वेद तज्ज्ञ सांगताहेत. (Winter season food should include fatty hot and spicy foods along with dry fruits Nashik News)

गेल्‍या चार दिवसांपासून कडाक्‍याची थंडी असून, वातावरणात कमालीचा गारवा जाणवतो. त्यामुळे दैनंदिन जनजीवन प्रभावित झाले आहे. आरोग्‍यविषयक तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. कफ, सर्दी, खोकल्‍यासारख्या सौम्‍य तक्रारींपासून ताप व संसर्गजन्‍य आजाराच्‍या गंभीर आरोग्‍यविषयक तक्रारी जाणवत आहेत. त्यामुळे चांगले आरोग्‍य राखण्यासाठी आहार-विहारात योग्‍य बदल करण्याचा सल्‍ला दिला जातो आहे.

श्‍वसनाच्‍या विकाराची घ्या काळजी

यंदाच्‍या हिवाळ्यात संसर्गजन्‍य आजारांसोबत चिमुकल्‍यांसमोर गोवरचा धोका निर्माण झाला आहे. तसेच ज्‍येष्ठांना या कालावधीत श्‍वसनाशी निगडित समस्‍या उद्‍भवतात. यापूर्वी दम्‍यासह अन्‍य स्वरूपाचे श्‍वसनाचे विकार असलेल्‍या नागरिकांनी विशेष काळजी घेण्याची आवश्‍यकता आहे. हृदयविकार, श्‍वसनाचा त्रास असलेल्‍यांनी दिवसभरात दालचिनीचा तुकडा तीन-चार वेळा चावून खावा. चिमुकल्‍यांना बुद्धीवर्धक आक्रोडचे चॉकलेट फायदेशीर ठरु शकते. चिमुकल्‍यांच्‍या नाकात तूप टाकावे.

Elon Musk Takeover Twitter : ट्विटरची टिवटिव थांबणार का?

आरोग्यविषयक टिप्स

* ताजे, गरम जेवण घ्यावे, शक्‍यतो उकळलेले, कोमट पाणी प्‍यावे.

* नागली, बाजरीचा आहारात अधिकप्रमाणात समावेश असावा

* सुकामेव्‍यात बदाम, विस्‍ता काळे मनुके आरोग्‍यवर्धक

* फलआहार दिवसाच्‍या वेळी करावा, व झोपताना सेवन टाळावे.

* दूध, दुग्‍धजन्‍य पदार्थ आहाराच्‍या सुरवातीला घेतलेले उत्तम

* फळभाज्‍या, रश्‍याच्‍या भाज्‍यांचा आहारात समावेश असावा.

* कडधान्‍यासह उसळीसह सकस आहार घ्यावा.

* एकाच वेळी पोटभर न खाता, ठराविक अंतराने खाणे योग्‍य

* केशर व दूध हे ज्‍येष्ठ, बालकांसाठी ठरेल उपयुक्‍त

* झोपताना व अंघोळीपूर्वी अंगाला तिळाचे, अभंग्‍य तेल लावावे.

* शेंगदाणा तेल, ऑलिव्‍ह ऑइलचा स्‍वयंपाकात वापर करावा.

* जेवणादरम्‍यान ताजे आले चावून खावे

* झोपताना शक्‍यतो थंड पाणी पिण्याचे टाळावे.

नियमित भोजन आणि चालणे महत्त्वाचे

युक्ताहारविहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु ।

युक्तस्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखहा ॥

श्रीमद् भगवतगीता मधील सहाव्या अध्यायातील हा १७ वा श्‍लोक आहे. अर्थात, मनुष्याला संसारातील कष्टातून मुक्तीसाठी काही गोष्टी आवश्‍यक आहे. त्यामध्ये नियमित भोजन, नियमित चालणे, नियमित विश्रांतीसह योग करायला हवा.

"हिवाळ्यात चांगला आहार घेताना पुढील वर्षभरात उत्तम आरोग्‍य राखता येऊ शकते. सुकामेवा, स्निग्‍ध, उष्ण व तीक्ष्ण पदार्थांचा आहारात समावेश करावा. गरम, ताजे अन्न घ्यावे व पाणीही शक्‍यतो गरम असावे. लहान मुले, ज्‍येष्ठ नागरिकांसह श्‍वसनाचे विकार असलेल्‍या व्‍यक्‍तींनी विशेष काळजी घ्यावी." - वैद्य विक्रांत जाधव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trump Special Envoy Sergio Gor: ट्रम्प यांचे विशेष दूत सर्जियो गोर यांचं मोठं विधान म्हणाले, ''भारत आमचा धोरणात्मक भागीदार अन्... ''

IND vs WI Test Series: केएल राहुलकडे कसोटी संघाचे नेतृत्व, श्रेयस अय्यरचे पुनरागमन; वेस्ट इंडिजविरुद्ध अशी असेल टीम इंडिया

Modem Balakrishna : कोण होता मॉडेम बालकृष्ण? तब्बल एक कोटींचा होता इनाम, खात्मा झाल्याने नक्षलवाद्यांना मोठा झटका

Pune News : तीन वर्षांच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या सावत्र बापाला मरेपर्यंत जन्मठेप

Nepal Protests : नेपाळमधील आंदोलनानंतर विमानसेवा सुरू, पर्यटकांचा मायदेशी परतीचा प्रवास

SCROLL FOR NEXT