wolf attack 2.jpg
wolf attack 2.jpg 
नाशिक

लांडगा आला रे आला! आणि तो खरंच आला; हिसवळ परिसरात खळबळ

अमोल खरे

मनमाड (जि.नाशिक) : चौघेजण  शेतातून जात असताना झाडाझुडपांत तो लपून बसला होता. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे हे चौघेही गांगरून गेले. त्यांनी आरडाओरडा केल्याने तो पळून गेला. आरडाओरडा ऐकू आल्याने लगतच्या काही तरुणांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेमुळे हिसवळ परिसरात खळबळ उडाली असून, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. काय घडले नेमके?

लांडगा आला रे आला! 

बिबटे, वाघ यांनी मनुष्यावर हल्ले केल्याचे ऐकिवात आहे. मात्र सहसा नजरेलाही न दिसणारे लांडगे हल्ला करतील, अशी शंकाही येणार नाही. मात्र ही गोष्ट खरी असून, मनमाडपासून जवळच हिसवळ बुद्रुक येथे सध्या लांडग्यांची चांगलीच दहशत आहे. रविवारी मीना आहेर, सुनीता पवार,  जगन आहेर व  मोहन सोळसे  हे चौघे  शेतातून जात असताना झाडाझुडपांत लपून बसलेल्या लांडग्याने त्यांच्यावर  हल्ला केला. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे हे चौघेही गांगरून गेले. त्यांनी आरडाओरडा केल्याने लांडगा पळून गेला. आरडाओरडा ऐकू आल्याने लगतच्या काही तरुणांनी घटनास्थळी धाव घेतली.

ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण,  दोन महिला, दोन पुरुष गंभीर जखमी 

तोपर्यंत लांडगा पसार झाला होता. जखमींना मनमाडच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. या घटनेमुळे हिसवळ परिसरात खळबळ उडाली असून, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. हा लांडगा इतरही व्यक्तींवर हल्ला करू शकतो, यासाठी वन विभागाने त्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.  येथून जवळच असलेल्या हिसवळ बुद्रुक येथे शेतात जाणाऱ्या चार जणांवर लांडग्याने हल्ला केल्याची घटना रविवारी (ता.१) घडली. या हल्ल्यात दोन महिला, दोन पुरुष गंभीर जखमी झाले. जखमींवर मनमाड उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT