Nashik Bribe Case esakal
नाशिक

Nashik Bribe Crime : 50 हजारांची लाच घेताना मंडळ अधिकाऱ्यासह महिलेला अटक

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : पाथर्डी परिसरातील जमिनीच्या तक्रारी अर्जावरील निकाल आपल्या बाजूने देण्यासाठी ५० हजारांच्या लाचेची रक्कम खासगी महिलेमार्फत स्वीकारल्याप्रकरणी मंडळ अधिकाऱ्यासह लाच स्वीकारणाऱ्या महिलेला अटक करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ही कारवाई केली. पुरुषोत्तम दत्तात्रय पराडकर (४०) असे मंडळ अधिकाऱ्याचे, तर केतकी किरण चाटोरकर (४१, रा. पाटील गार्डन, चार्वाक चौक, इंदिरानगर) अशी दोघा लाचखोर संशयितांची नावे आहेत. (Woman arrested with board officer while accepting bribe of 50 thousand Nashik Bribe Crime New)

तक्रारदाराने केलेल्या अर्जानुसार, जमिनीसंदर्भातील तक्रारीचा निकाल त्यांच्या बाजूने देण्यासाठी पाथर्डीचे मंडळ अधिकारी पुरुषोत्तम पराडकर यांनी संशयित महिला केतकी चाटोरकर यांच्यामार्फत एक लाखाच्या लाचेची मागणी तक्रारदाराकडे केली होती. त्यासंदर्भात तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या पडताळणीतही पंच व साक्षीदारासमोर संशयित महिला चाटोरकर यांनी लाचेची मागणी केली. त्यानंतर ५० हजार रुपये पराडकर यांनी संशयित केतकी यांना स्वीकारण्यास सांगितले.

त्यानुसार तक्रारदारांकडून ५० हजारांची लाचेची रक्कम स्वीकारली. या प्रकरणी दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. याप्रकरणी इंदिरानगर पोलिसांत गुन्हा दाखल झाला. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक सुनील कडासने, अपर अधीक्षक नारायण न्याहाळदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक व सापळा अधिकारी वैशाली पाटील, पोलिस नाईक शरद हेंबाडे, राजेंद्र गिते, महिला अंमलदार शीतल सूर्यवंशी यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT