woman beat up nashi city bus conductor and driver incident captured in cctv
woman beat up nashi city bus conductor and driver incident captured in cctv 
नाशिक

Video : सिटी बसमध्ये घुसून महिलेची कंडक्टर-ड्रायव्हरला मारहाण

योगेश मोरे

म्हसरूळ (नाशिक) : महापालिकेच्या सिटी लिंक या शहर बसमध्ये घुसून महिलेसह तिच्या साथीदारांनी हैदाेस घालून वाहकासह चालकाला जबर मारहाण केल्याची घटना शनिवारी (ता. १३) रोजी घडली आहे. सदरचा संपूर्ण प्रकार बसच्या सीसीटीव्ही मध्ये कैद झाला असून म्हसरूळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

मनपाची नव्याने सुरु झालेली सिटी लिंक ही शहर बस सेवा सध्या चांगले उत्पन्न मिळवत आहे. मात्र काही संशयित नव्या बसेस लक्ष करत आहेत. गेल्या काही महिन्यांपूर्वी सातपूर येथे एका नव्या बसची ताेडफाेड करण्यात आली हाेती. त्यानंतर पुन्हा शनीवारी म्हसरुळच्या बोरगड परिसरातील कणसरा माता चौकात पूनारवृती झाली.बस क्रमांक एम एच १५ जी व्ही ७८७०, (११०) बसचालक गोकुळ काकड ,वाहक अक्षय गवारे हे नाशिकरोड हून बोरगड कडे जात असलेल्या सिटी लिंक बसच्या चालकाला आणि वाहकाला मारहाण करण्यात आली.

‘आमच्या गाडीला ओव्हरटेक का केले आमच्या गाडीला धक्का लागला’ याचा जाब विचारत टाटा मानझा औरा चारचाकी वाहन क्रमांक एम एच ०२ बी आर ९४८५ तील संशयित महिला आणि तिच्या साथीदारांनी बस अडवली. तसेच बसमध्ये घूसून चालकाशी वाद घालून मारहाण केली. वाहक समजावत असताना त्यालाही मारहाण करण्यात आली. मारहाणीची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून म्हसरूळ पोलीस ठाण्यात अनाेळखी महिला आणि तिच्या साथीदारांविरोधात तक्रार दाखल झाली आहे. तसेच सिटी लिंक बस कंपनीकडून देखील कर्मचाऱ्यांना झालेल्या मारहाणीची गंभीर दखल घेण्यात आल्याचे कळते.

या प्रकरणी बस ड्रायव्हर कंडक्टर यांचे म्हणणे असे आहे की,सदर बस ही नाशिकरोड ते बोरगड असा रूट होता. बोरगड येथील कणसरा माता चौकात सिटी लिंक बस जात असताना त्यांना एक वाहन आडवे आले ,यावेळी सदर वाहन चालक मालक यास वाहन बाजूला घेण्यास बस ड्रायव्हरने सांगितले .परतू यावर वाहन चालक यांनी अरेरावी करत,आमच्या वाहनास धक्का लागल्यास तुम्हाला मारहाण करू तुमची बस पेटवून देऊ,असे म्हणाले. आमच्या गाडीला ओव्हरटेक का केले असे म्हणत बस मध्ये घुसून एका महिलेसह चार ते पाच साथीदारांनी जबर मारहाण केली.सदर प्रकार सीसीटीव्ही कैद झाला आहे.बस ड्रायव्हर व कंडक्टर हे शासकिय रूग्णालयात उपचार घेत आहेत. नाशिक शहरात असे प्रकार पुन्हा घडू नये यासाठी पोलिस प्रशासन काय कठोर पाऊले उचलते याकडे सर्वसामान्याचे लक्ष लागून राहिले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

Waluj Nagar Accident : हळद लागण्यापूर्वीच काळाने घातली झडप, दुचाकीच्या अपघातात तरुण ठार

IPL 2024, KKR vs DC Live Score: कोलकाताने गमावली तिसरी विकेट, रिंकू सिंग स्वस्तात झाला आऊट

''सत्तेत आल्यास जातनिहाय आणि आर्थिक सर्वेक्षण करू.. राज्य घटना बदलण्याचा भाजप आणि संघाचा कट'', काय म्हणाले राहुल गांधी?

Satara : कऱ्हाडला घुमला 'मोदी...मोदी'चा नारा; महायुतीच्या नेत्यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन, रखरखत्या उन्हातही मोठा उत्साह

SCROLL FOR NEXT