Chain Snatching esakal
नाशिक

Nashik Crime: बतावणी करून महिलेची पोत केली लंपास; मोफत रेशन भेटत असल्याचे सांगत केली हातचलाखी

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : कधी पोलीस तर कधी काहीतरी बतावणी करून हातचलाखीने सोन्याचे दागिने लंपास करण्याचे प्रकार सतत घडत असतात. नाशिकरोड परिसरात भाजीविक्रेत्या महिलेला मोफत रेशन भेटत असल्याचे सांगत, तिच्या गळ्यातील साेन्याची पोत काढण्यास भाग पाडून पिशवीत ठेवण्यास सांगितले.

त्यासाठी मदत करताना संशयिताने हातचलाखीने महिलेचे ५६ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याचा प्रकार घडला आहे. (Woman chain stolen by pretending said they getting free rations Nashik Crime)

कौशाबाई पांडुरंग मोरे (रा. पळसे, दारणानगर) यांच्या फिर्यादीनुसार, त्या गेल्या मंगळवारी (ता.२२) दुपारी साडेबाराच्या सुमारास नाशिकरोडच्या शिवाजी पुतळ्यासमोरील गुजरी गल्लीमध्ये भाजीपाला व्रिकी करण्यासाठी बसलेल्या होत्या.

त्यावेळी एक अनोळखी इसम त्यांच्याकडे आला आणि त्याने म्हतार्या महिलांना मोफत रेशन वाटत असल्याचे सांगितले. त्यावेळी त्याने कौशाबाई यांना त्यांच्या गळ्यातील सोन्याची पोत काढून पिशवीमध्ये ठेवण्यास सांगितले.

त्याप्रमाणे कौशाबाई यांनी गळ्यातील ५० हजारांची सोन्याची पोत व रोख रक्कम असा ऐवज काढून पिशवीत ठेवत असताना, संशयित अनोळखी इसमाने पिशवीला गाठ बांधून देतो असे सांगून त्यांच्या हातातील पिशवी घेतली आणि हातोहात त्यातील दागिने हातचलाखीने लंपास केले.

त्यानंतर तो निघून गेला. महिला संशयिताने सांगितल्या ठिकाणी जाऊन आली असता, तिला काहीच दिसले नाही. तिच्याकडील पिशवी पाहिली असता त्यातील सोन्याची पोत व पैसे नसल्याचे लक्षात आले.

फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तिने नाशिकरोड पोलिसात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार, गुन्हा दाखल करण्यात आला असून, हवालदार शेख तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT