Mother and baby safe in rural hospital  esakal
नाशिक

Nashik News : महामार्गावरच महिला झाली प्रसूत; गोंडस बाळाला जन्म!

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : मुंबई-नाशिक महामार्गावरील पिंप्रीसदो चौफुली फाटयावर भर उन्हात शनिवारी (ता.१०) आठवडे बाजार करण्यासाठी रिक्षाची वाट पाहत उभ्या असणाऱ्या दुर्गा वाळू झुगरे (रा. वाकडपाडा) या आदिवासी महिलेला महामार्गावरच प्रसूती कळा सुरु झाल्या. ( woman gave birth to baby on highway nashik news )

जवळच उभे असलेले घोटी टोल नाक्यावरील ग्रुप पेट्रोलिंगच कंट्रोल रूम ऑफिसर समीर चौधरी, गुलाब गवळी, चालक नारायण वळकंदे यांनी या भगिनीची अवस्था पाहून तिला मदत करण्याचा निर्णय घेतला. मात्र तत्पूर्वीच महिलेने महामार्गावरच एका गोंडस बाळाला जन्म दिला.

रूट पेट्रोलिंग टीमच्या कर्मचाऱ्यांनी यानंतर महिलेसह तिच्या बाळाला ग्रामीण रुग्णालयात तातडीने दाखल केले. आई आणि बाळ दोन्ही सुरक्षित असल्याने सोबत असलेल्या नातेवाईकांनी कर्मचाऱ्यांचे आभार मानले. पिंप्रीसदो फाट्यावरून ही आदिवासी महिला नातेवाईकांसोबत इगतपुरी शहराकडे चालली होती.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्याचवेळी ही घटना घडली. माता आणि बाळ सुरक्षित असल्याची माहिती डॉ. सुशांत श्रीवास्तव व परिचारीका सुमन पगारे यांनी दिली. गरोदर माता व अन्य रूग्णांना कोणत्याही शासन योजना मिळत नसल्याने शहरात खासगी रूग्णालयांचा आधार घ्यावा लागतो.

या घटनेमुळे गरोदर मातांना प्रसूती वेळ व तारीख माहिती होत नाही, यामुळे रस्त्यावर किंवा शेतात बाळाचा जन्म होतो. आदिवासी वाडया पाडया वरील या घटनांचा शासनाने गंभीर विचार करून आरोग्याबाबत ठोस पाऊल उचलून सुविधा पुरविण्याची गरज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satej Patil Shivaji Patil : गोकुळच्या रणधुमाळीत सतेज पाटील, शिवाजीराव पाटलांच्या घरी; महायुतीत नाराजीचा ‘वेध’ घेतल्याची चर्चा

यशचा डबल रोल, दमदार अ‍ॅक्शन अन् जबरदस्त स्टाईल; ‘Toxic’ किती भावला? पण ३ तास १४ मिनिटांचा सिनेमा करतो बोअर!

Pune Crime: श्रावणात दारू पिऊन घरी आला अन् मटणाची मागणी केली ; वडिलांच्या मारहाणीत मुलाचा मृत्यू

Marathi News Live Updates : ई-चलनाविरोधातील आमरण उपोषण तात्पुरते स्थगित; दोन आठवड्यांत निर्णय न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा

Ichalkaranji Politics : इचलकरंजीचं राजकारण तापणार! प्रकाश आवाडे थेट लोकसभेच्या रिंगणात? खासदार माने गटाची वाढली धडधड, 'त्या' वक्तव्यानं वाढवलं टेन्शन

SCROLL FOR NEXT