Female priest Vinaya Joshi esakal
नाशिक

पौरोहित्‍यातही महिलाराज : पौरोहित्‍य शिकताना प्रगतिपथावर पोचल्‍याचा आनंद

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : विनया जोशी यांचे शिक्षण बी. एस्सी. परंतु, लग्‍नानंतर नोकरी करणे अशक्‍य असल्‍याने पौरोहित्‍य विषयाची निवड करत मार्ग सापडल्‍याचा आनंद व उत्तरोत्तर प्रगतीच्‍या प्रवासाविषयीचे वर्णन त्‍यांनी ‘सकाळ’शी संवाद साधत केले. (woman rule in Priesthood Vinaya Joshi nashik Latest Marathi News)

विनया जोशी यांचे माहेर बडोद्याचे, आई धार्मिक व वडील रेल्‍वेत असले तरी व्यंकटेशाचे पारायण करणे, पूजा करणे यामुळे लहानपणीच संस्‍कार झाले. आठवीत त्या बोर्डाच्या परीक्षेत संस्‍कृत विषयात प्रथम आल्या. तसेच दहावीलाही संस्कृत विषयात विशेष प्रावीण्य मिळवले. त्‍यांचे सासर नाशिक रोड येथील.

त्यांनी संस्‍कृत विषयाच्या प्रेमापोटी १९९० राणी भवनमध्ये वर्गात प्रवेश घेतला. वीणा मोडक यांच्या मार्गदर्शनाखाली तीन वर्षे शिक्षण घेत पुढील शिक्षण त्‍यांनी जोशी गुरुजी व साने गुरुजी यांच्याकडे घेतले. जोशी गुरुजींकडे सप्तशतीचे एक वर्ष शिक्षण घेतले.

तसेच वेदोक्‍त शिक्षण घेतले. व्यक्तिमत्त्व व आरोग्‍य यावर शुध्द, स्पष्ट उच्चार तसेच ३३ व्यंजनाप्रमाणे आपले ३३ मणके म्‍हणून ताठ बसून मंत्रपठण केल्‍यास पाठीच्या मणक्‍यावर सकारात्‍मक आघात होऊन आरोग्‍य चांगले राहते.

नंतर त्‍यांच्या भागात म्‍हणजे नाशिक रोड येथील सायट्रिक ते बोधलेनगर या भागात वर्ग सुरू केले. या सर्वांसाठी घरून पाठिंबा मिळाला. त्‍यांची नणंद जान्हवी परांजपे यांच्यासमवेत त्‍यांनी पौरोहित्‍याचे शिक्षण घेतले.

घरातील वातावरण सकारात्‍मक व धार्मिक होण्यास मदत झाली. मुलीने गंगा- गोदावरी उत्‍सवात पुरुष सुक्‍त म्‍हणून पहिल्‍या क्रमांकाचे बक्षिस मिळवले. त्‍यांना स्वतःला रुद्रपठणात पारितोषिक मिळाले आहे. आतापर्यंत तीन कुंभमेळ्यात त्यांनी पठण केले आहे.

नाशिक येथे माजी मंत्री दौलत आहेर, स्‍मृती इराणी तसेच बंडोपंत जोशी गुरुजी यांच्याकडून त्‍यांचा सत्‍कार करण्यात आला आहे. अशाप्रकारे पौरोहित्‍य शिकताना तसेच करताना उत्‍तरोत्‍तर प्रगती होत गेल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : काँग्रेसच्या पत्रानंतरही मकर संक्रातीला लाडक्या बहीणींना पैसं मिळणार? CM फडणवीसांनी एका वाक्यात उत्तर देत विषयच मिटवला...!

IND vs NZ, 1st ODI: शुभमन गिलने जिंकला टॉस; भारताच्या संघात ६ गोलंदाजांची निवड, पाहा प्लेइंग इलेव्हन

Aquarius Yearly Horoscope : कुंभ राशीला साडेसातीचा त्रास, पण यंदाच्या वर्षात नेतृत्व गुण उजळतील

द कपिल शर्मा शो फेम अभिनेत्रीला झालाय असाध्य आजार; मुलाने व्हिडीओ शेअर करत दिली माहिती

Yogeshwar Dutt : "ऑलिंपिक पदक हवे असेल तर मॅटवर उतरा!"; योगेश्वर दत्त यांचा महाराष्ट्राच्या कुस्तीपटूंना मोलाचा सल्ला

SCROLL FOR NEXT