well.jpg 
नाशिक

मेंढपाळ व्यवसाय करणाऱ्या महिलेचा विहिरीत आढळला मृतदेह; येवला तालुक्यात खळबळ

सकाळवृत्तसेवा

नाशिक : (येवला) सायंकाळच्या सुमारास विहिरीजवळची गर्दी बघून जो तो तिकडे धाव घेऊ लागला. नेमकं काय घडलं हे जाणून घेण्याची ज्याला त्याला उत्सुकता होतीच. मात्र प्रकार कळताच संपूर्ण परिसर हादरला. वाचा काय घडले?

अशी आहे घटना

तालुक्यातील बोकटे येथे सायंकाळच्या सुमारास कोळगंगा नदीच्या किनाऱ्यावरील विहिरीत महिलेचा मृतदेह आढळल्याने बोकटेसह परिसरात खळबळ उडाली. याप्रकरणी येवला तालुका पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली. मृत महिलेची ओळख पटली असून, ही महिला सायगाव येथील मेंढपाळ व्यवसाय करणाऱ्या मुक्ताबाई दत्तात्रय भालेराव (वय ३१, हल्ली मुक्काम अंदरसूल) कुटुंबासह बोकटे परिसरात मेंढ्या चरण्यासाठी घेऊन आली होती. बोकटे येथील कोंबडवाडी शेजारीच तात्पुरत्या स्वरूपात पाल तयार करून राहत होती. 

घटनेची माहिती मिळताच बोकटेचे पोलिसपाटील सुरेश दाभाडे यांनी तालुका पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत ग्रामस्थांच्या मदतीने महिलेचा मृतदेह विहिरीबाहेर काढला. पंचनामा करून मृतदेह विच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवला. मृत्यूचे कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT