crime 
नाशिक

'तुझा पतीच पोलिस खात्यात, आम्हाला काही होणार नाही' म्हणत सासरच्यांकडून छळ; गुन्हा दाखल

अजित देसाई

नाशिक/सिन्नर :  पोलिस हे सर्वसामान्यांच्या रक्षणासाठी काम करतात मात्र पोलिस दलात काम करणाऱ्या पतीनेच पत्नीला छळ करायचा. तसेच या त्रासाबद्दल पोलिसांत तक्रार करणार असल्याचे पीडितेने सांगितले असता तुझा पती पोलिस खात्यात असल्याने आमचे काही होणार नाही. तुला काय तक्रार करायची ती दे असा दम पीडितेला दिला जात असे.

पैशांचा तगादा थांबेना

सिन्नर तालुक्यातील फर्दापूर येथील शेतकरी रावसाहेब दत्तात्रय रानडे यांची कन्या कांचन हिचा विवाह 31 मे 2019 रोजी येवला तालुक्यातील मुखेड येथील योगेश सुनील आहेर याच्याशी झाला होता. विवाहानंतर तीन महिने सासरच्यांनी कांचनला चांगली वागणूक दिली. मात्र, त्यानंतर पती योगेश, सासू मंदाबाई यांनी बंगला बांधण्यासाठी 10 लाख रुपये, तर चार चाकी गाडी घेण्यासाठी 5 लाख रूपये आई - वडिलांकडून आणण्याचा तगादा सुरू केला. याबाबत कांचन हिने वडिल रावसाहेब रानडे यांच्या कानावर ही बाब सांगितली. वडिलांची परिस्थिती नसतानाही त्यांनी उसनवारीने 91 हजार 800 रूपये योगेश यांना आरटीजीएसद्वारे दिले. त्यानंतर काही दिवसांतच परत त्यांनी पैशांचा तगादा लावला. त्यासाठी कांचन हिस माहेरी फर्दापूर येथे पाठवून दिले. पैसे आणले तरच सासरी यायचे, असा दम सासरच्यांनी भरला. त्यामुळे माहेरी येऊन कांचन हिने सदर बाब वडिल रावसाहेब यांच्या कानावर घातली. त्यांनी विवाह जमविणार्यांना सांगितल्यानंतर मध्यस्थींनी कांचंनचा पती, सासू, सासरे यांना यापुढे असे प्रकार होऊ देऊ नका असे समजून सांगितले.

माहेरून पैसे आणत नाही म्हणून छळ

त्यानंतर कांचन पुन्हा सासरी मुखेड येथे नांदण्यासाठी गेली. तीचा पती पालघर येथे महाराष्ट्र पोलीस दलात असल्याने ते अनेकदा सुटीच्या दिवशी घरी येत नसे. मात्र, घरी आल्यावर दोन्ही ननंद मुखेडला येत असत. जोपर्यंत ही माहेरून पैसे आणत नाही, तू हिला येथे ठेवू नको, फारकत देऊन टाक असे त्या भाऊ योगेशला सांगत व कांचनला शिवीगाळ, मारहाण, दमदाटी करीत असत.

सासरच्यांविरोधात गुन्हा दाखल

या त्रासाबद्दल पोलिसांत तक्रार करणार असल्याचे पीडितेने सांगितले. 'तुझा पतीच पोलिस खात्यात असल्याने आमचे काही होणार नाही. तुला काय तक्रार करायची ती दे' असे सासरच्यांनी सांगितले. कोरोना काळात माहेरी पाठवून दिल्यावर 3 जूनला नाशिकच्या महिला सुरक्षा विभागात कांचनने तक्रार दाखल केली. तरीही सासरच्यांनी नांदवण्यास नकार दिल्याने महिला सुरक्षा विभागाने सासरच्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे पत्र 28 ऑक्टोबर रोजी वावी पोलीस ठाण्यास दिले. त्या पत्राच्या संदर्भाने पती योगेश, सासरे सुनील आहेर, सासू मंदाबाई आहेर, ननंद सोनाली विनोद डोकफोडे (रा. सिन्नर), मोनाली गणेश नागरे (रा. खेडलेझुंगे) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Divorce Petition :‘काळा रंग, जाडजूड शरीरयष्टी’वरून पत्नी टोमणे मारते; पतीने मागितला घटस्फोट, हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

लग्नाला १२ वर्ष होतील तरीही मला कळलेलं नाही की... श्रेया बुगडेने सांगितलं नवरा निखिल सेठसोबत कसं आहे नातं

Petrol-Diesel Price: कच्चे तेल महाग होत असताना आता भारतात पेट्रोल-डिझेलचे भाव वाढणार का? सरकारकडून स्पष्टीकरण

Maharashtra Ganesh Visarjan Live: कसबा गणपतीच्या मिरवणुकीला उत्साहात सुरुवात, बाप्पाचे देखणे रूप पाहण्यासाठी आणि निरोप देण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी

IND vs WI 1st ODI: ऋतुराज गायकवाड IN, यशस्वी जैस्वाल बाकावरच! नबीचे पदार्पण; पहिल्या वन डेसाठी तगडी Playing XI

SCROLL FOR NEXT