women of tribal areas made ladoo shankarpale sweets gulab jamun from flowers of moha nashik news esakal
नाशिक

Sakal Special : अंडी, चिकनपेक्षा भारी मोहाचे लाडू, गुलाबजाम; बचतगटांचा अभिनव उपक्रम

सकाळ वृत्तसेवा

किरण कवडे : सकाळ वृत्तसेवा

Sakal Special : आदिवासी भागात मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेल्या मोहाच्या झाडांचा उल्लेख आला, की त्यापासून बनविण्यात येणाऱ्या दारूचीच जास्त चर्चा होते.

पण आदिवासी भागातील महिलांनी बचतगटाच्या माध्यमातून याच मोहाच्या फुलांपासून लाडू, शंकरपाळे, मिठाई, गुलाबजाम, एनर्जी पावडर अन् टॉनिक असे पदार्थ बनविले आहेत. (women of tribal areas made ladoo shankarpale sweets gulab jamun from flowers of moha nashik news)

अंडी आणि चिकनपेक्षा जास्त प्रथिने असलेले लाडू तर कुपोषित बालकांसाठी वरदान ठरत आहेत.

जिल्ह्यातील पेठ, सुरगाणा व कळवण या आदिवासी बहुल तालुक्यांमधील महिलांनी श्रमजीवी महिला सामाजिक संस्थेच्या माध्यमातून मोहाच्या फुलांपासून तब्बल २२ पदार्थ करण्याचा शोध लावला आहे. सामाजिक कार्यकर्त्या माया मुक्ताई यांनी पेठ तालुक्यातील गावंडपाडा यासह जवळच्या तीन गावात पाच ते सहा बचतगट तयार केले आहेत.

येथील महिलांना उन्हाळ्यात रोजगारासाठी स्थलांतर करावे लागते. पण त्यांच्या हाताला गावातच काम दिले तर त्या आनंदाने करतील आणि सेंद्रिय अन्नपदार्थ तयार होतील. मोहांच्या फुलांपासून तयार होणाऱ्या दारूमुळे या झाडासह फुलांची प्रचंड बदनामी झाली आहे. त्यापासून आदिवासी समाजाल प्रवृत्त करण्याचा प्रयत्न या पदार्थांच्या माध्यमातून केला जात आहे.

मोहाच्या फुलांचे औषधी गुणधर्म लक्षात घेऊन त्यांच्यापासून महिला व बालकांच्या आरोग्यासाठी शंकरपाळे, गुलाबजाम, उत्साहवर्धक पेय असे वेगवेगळे पदार्थ माया मुक्ताई यांनी बनविले आहेत. यातील पाच पदार्थ सध्या बाजारात उपलब्ध असून, मुंबईतील ग्राहकांची त्याला पसंती मिळत आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

‘दारू’ची होते विचारणा

कोरोनाकाळात मोहाच्या दारूचा प्रसार इतक्या झपाट्याने झाला आहे, की मोहाची फुले म्हटले तरी आजही दारूचीच चर्चा होते. मोहाच्या फुलांपासून खाद्यपदार्थ बनविले जात असल्याचे सांगितल्यानंतर या पदार्थाबरोबरच ग्राहक ‘दारू’चीही विचारणा करतो. ही ओळख पुसण्याचे काम या महिला करत आहेत.

"आदिवासी बांधवांच्या अनेक पिढ्या या मोहाच्या दारूने बरबाद केल्या. त्यांना यापासून दूर नेण्यासाठी मोहाच्या फुलांपासून औषधी गुणधर्म असलेले पदार्थ बनविण्यासाठी साधारणतः ५ वर्षे संशोधन केले.

घरच्या घरी पदार्थ बनविले. ते साधारणत: वर्षभर टिकतात, हे लक्षात आल्यानंतर आता ऑर्डरप्रमाणे बनवतो. याचे वैशिष्ट्य म्हणजे कुपोषण निर्मूलनासाठी लाडूचा प्रभावी वापर होऊ शकतो. त्यातून महिलांना रोजगारही उपलब्ध होईल. राज्यातील काही सामाजिक संस्थांची मदत घेत आहोत." -माया मुक्ताई (खोडवे), संचालिका ः श्रमजीवी महिला सामाजिक संघटना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नोरासारखी दिसायला पाहिजे, पत्नीला दररोज ३ तास...; पतीकडून छळ, महिलेची पोलिसात तक्रार

Maharashtra Latest News Update: माजी आमदार बाबाजानी दुर्रानी यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत सदस्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

रील्सचा मोह करतोय मेंदूवर दारूसारखा परिणाम? जाणून घ्या धोके आणि तज्ज्ञांनी सांगितलेले उपाय

माेठी बातमी! 'इंडिया आघाडीचे खासदार आक्रमक; दूध दर वाढीसाठी संसद भवनासमोर आंदोलन', भेसळ करणाऱ्यांवर कारवाई करा

Pune Rain Update : ताम्हिणी घाटात ५७५ मिमी पावसाची नोंद; पुण्यात रेड अलर्ट

SCROLL FOR NEXT