female priest manjiri oak
female priest manjiri oak esakal
नाशिक

पौरोहित्‍यातही महिलाराज : वाचनाच्या आवडीने पौरोहित्‍याचा प्रवास सुखकर

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : मैत्रिणीकडून प्रोत्साहन मिळाले, तसेच लहानपणापासून आवड असल्‍यामुळे मैत्रिणीसोबतच पौरोहित्‍य वर्गात प्रवेश घेतला. मंजिरी ओक यांच्याशी ‘सकाळ’ने संवाद साधून त्यांच्या पौरोहित्याच्या प्रवासाविषयी जाणून घेतले. (women rule in priesthood Manjiri Oak nashik Latest marathi news)

मंजिरीताईंचे माहेर ठाणे येथील. त्‍यांच्या आजोबांनी त्‍यांच्याकडून लहानपणापासूनच विष्‍णूसहस्‍त्रनाम, नित्‍य स्‍तोत्रपठण करून घेतले होते. त्‍यांना वाचनाची प्रचंड आवड असल्‍याने पौरोहित्‍य शिकताना फारशी अडचण आली नाही, असे त्‍या म्‍हणाल्‍या. त्‍यांचे सासर नाशिकचे.

राणीभवनात महिलांसाठी पौराहित्‍याचे वर्ग सुरू आहेत, आपण ते करू’, असे त्यांची मैत्रीणी त्यांना सांगत असे. त्‍यामुळे कुतूहल निर्माण झाले. त्‍यांनी मैत्रीणीसमवेत पौरोहित्‍याच्या वर्गात २००३ मध्ये प्रवेश घेतला. जयश्री कुलकर्णीताईंच्या मार्गदर्शनाखाली तीन वर्ष शिक्षण घेतले.

पुढील शिक्षण दुगलताईंकडे घेतले. यामुळे उच्चारातील शुद्धता वाढली, तसेच अर्थ, त्‍यामागचे शास्‍त्रीय कारण, हेतू, उद्देशांच्या विस्‍तृत ज्ञानामुळे गोडी व आवड निर्माण झाली. त्यांना कुटुंबाकडून पाठिंबा मिळाला. पौरोहित्यामुळे मुलांवरही छान परिणाम झाले.

त्‍यांचे स्‍तोत्र, विष्‍णूसहस्‍त्रनाम यांचे पठण झाले. घरातील वातावरणात विशेष फरक जाणवला. वातावरणातील सकारात्‍मक व उत्‍साहामुळे एकंदर आरोग्‍यही छान राहते. ‘सूनबाई पौरोहित्‍य करतात’, असे सासूबाई आलेल्‍या प्रत्येकाला सांगतात.

त्‍यामुळे खूप आनंद व अभिमानही वाटतो, असे त्‍या म्‍हणाल्‍या. पूजा विधीचा अर्थ सांगून यजमानांनाही मिळणारे समाधान व त्‍यांच्‍या हातून उदात्त कार्य होते, याचा आनंद मिळतो. यजमानांची सकारात्‍मक प्रतिक्रिया आपल्‍या कामाची छान पावती असते.

यामुळे मिळणारे मानसिक समाधान उच्चप्रतीचे असते. नातेवाइकांकडे पूजा त्‍याच सांगतात. साने गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली सामूहिक पठणात पंचवटीत, तसेच गोरेराम मंदिरात महिलांबरोबर सहभाग घेत असल्याचा आनंद वेगळाच व समाधानकारक असतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: वादळी वाऱ्यामुळे लोणी-काळभोरमध्ये बँड पथकावर होर्डिंग कोसळलं, घोडा गंभीर जखमी

IPL 2024 RCB vs CSK Live Score: बेंगळुरू चेन्नई प्लेऑफच्या एका जागेसाठी भिडणार, पण पावसाचे अंदाज काय?

'मोठं होऊन पंतप्रधान व्हाल', ज्योतिषीने केली होती भविष्यवाणी; प्रियांका गांधींनी सांगितला किस्सा

Virat Kohli: भारतीय संघात संधी मिळण्यासाठी रैनाची कशी झाली मदत? विराटनं सांगितली 16 वर्षांपूर्वीची आठवण

Lok Sabha Election 2024 : पंतप्रधान मोदींनी रायबरेली, अमेठीत प्रचार करणे टाळले, नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT