A woman sweeps dust in front of a gold and silver shop
A woman sweeps dust in front of a gold and silver shop 
नाशिक

Nashik News: सराफ बाजारातील मातीवर अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह; अनेक वर्षांची परंपरा

सकाळ वृत्तसेवा

Nashik News: सराफ बाजारातील मातीवर अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह सुरू आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी दैनंदिन काही कुटुंबातील सदस्य सकाळ, सायंकाळ सराफ बाजारातील दुकानांसमोर झाडू मारून साठवलेल्या मातीत सोने, चांदी शोधून त्यांची विक्री करतात. त्यावर त्यांचा उदरनिर्वाह होत असतो. यामुळे जणू सराफ बाजारातील मातीस सोन्याचा मोल येत असतो.

‘वाळूचे कण रगडीता तेलही गळे’, अशी जुनी म्हण आहे. अर्थात प्रयत्न केले तर ध्येय गाठणे अवघड नाही. रोजगाराचेही असेच आहे. केवळ रोजगार नाही, असे म्हणत रडगाणे करणे समाधान नाही. (women Search gold and silver in soil stored by sweeping in front of shops in Sarafa Bazar nashik news)

उलट कुठल्याही गोष्टीतून रोजगार उपलब्ध होऊन कुटुंबाचा उदरनिर्वाह भागू शकतो. अशी भावना ठेवत कार्य केले तर रोजगार हमखास प्राप्त होतो. त्यातूनच कुटुंबाचा उदरनिर्वाह चालण्यासदेखील मदत होत असते.

याची जाणीव सराफ बाजारातील सोन्या-चांदीचे कण शोधणाऱ्या महिलांनी करून दिली. दैनंदिन विविध भागातील महिला, पुरुष सराफ बाजारात येऊन कुणी सकाळी, कुणी दुपारी तर काहीजण सायंकाळी दुकानांसमोरील माती झाडून गोळा करतात. त्यात सोन्या, चांदीचे कण शोधत असतात. महिन्यास प्रत्येक महिला पुरुष सुमारे एक ग्रॅम सोने चांदी मातीत शोधून साठवून सोनारास त्याची विक्री करत असतो.

त्यातून त्यांना सुमारे सहा ते सात हजार रुपयांचे उत्पन्न मिळत असते. कुटुंबातील दोन सदस्य काम करत असतील तर दोन्ही सदस्य मिळून सुमारे पंधरा हजार रुपये मिळतात. त्यातून त्यांचा उदरनिर्वाह चालण्यास मदत होत असते. अशा प्रकारच्या कामास अनेक वर्षांची परंपरा आहे. माती गोळा करणाऱ्या कुटुंबीयांच्या पिढ्यानपिढ्या हा व्यवसाय करत असल्याचे त्यांनी सांगितले.

असा घेतला जातो शोध

सर्वप्रथम सराफ बाजारातील सोन्या चांदीच्या दुकानांसमोर झाडू मारून तसेच विशिष्ट प्रकारचे ब्रश वापरून तेथील माती एका पाठीत जमा केली जाते. त्यानंतर नदी किंवा घरी साठवलेले पाणी माती असलेल्या लोखंडी पाठीत काही प्रमाणात टाकले जाते. माती पाण्यात विरघळून मातीत असलेले सोन्या-चांदीचे कण पाटीत खाली बसतात.

त्यानंतर मातीमिश्रित पाणी हळुवार गाळून बाजूला केले जाते. उर्वरित थोड्याफार मातीत लगेचच सोन्या-चांदीचे कण चमकून नजर येतात. ते कण एका ठिकाणी साठवले जातात. अशाप्रकारे प्रक्रिया करून महिनाभरात सुमारे एक ग्राम सोने प्रति व्यक्तीकडून काढले जाते.

"पिढ्यान पिढ्या अशा प्रकारचे काम करत आलो आहे. यातून मिळणारे उत्पन्नात महागाईमुळे जगणे शक्य होत नाही. मात्र नाहीपेक्षा आधार मिळत असल्याने उदरनिर्वासाठी काम केले जाते." - मीनाबाई गावढे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT