Women Trouble hypertension after forty.jpg 
नाशिक

चाळिशीनंतर महिला दुय्यम उच्च रक्तदाबाने त्रस्त!..हृदयविकार, अर्धांगवायूची भीती..  

सकाळवृत्तसेवा

नाशिक : बदलती जीवनशैली आणि सातत्याने वाढत्या ताणतणावामुळे राज्यात उच्च रक्तदाबाच्या रुग्णांची संख्या मोठी आहे. करिअर आणि घर अशा दोन्ही पातळ्यांवर काम करण्याचा अव्यक्त ताण महिलांमध्ये दिसतो. यामध्ये महिलांची संख्या अधिक असून, जवळपास चार ते पाच महिलांमध्ये एकीला रक्तदाबाची समस्या असल्याचे चित्र आहे. रक्तदाब नियंत्रणामध्ये न राहिल्यामुळे किंवा वेळेवर निदान न झाल्यामुळे पक्षाघात, मेंदूला रक्तपुरवठा खंडित होणे, हृदयविकार यासारखी आपत्कालीन वैद्यकीय परिस्थिती निर्माण होऊ शकते. 

पाच टक्के गर्भवतींना उच्च रक्तदाब 
शहरातील अनेक महिला दुय्यम उच्च रक्तदाबाने त्रस्त आहेत. त्यामुळे पूर्वी पन्नाशीनंतर महिलांना रक्तदाबाची समस्या जाणवायची. मात्र, सध्या अतिरिक्त तणावामुळे तिशीतील महिलांनाही या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. उच्च रक्तदाबाच्या रुग्णांमध्ये चक्कर, भोवळ, हातापायाला मुंग्या येणे, उलटी आल्यासारखे वाटणे, धडधडणे अशी लक्षणे दिसतात. शहरी महिलांमध्ये उच्च रक्तदाबाचे प्रमाण दहा टक्के असून, ग्रामीण महिलांमध्ये हेच प्रमाण सात ते आठ टक्के आहे. गर्भाच्या वारेत किंवा गर्भवेष्टनात पुरेशा रक्तवाहिन्या तयार न झाल्याने गर्भवतींमध्येही उच्च रक्तदाबाची समस्या बघण्यास मिळत आहे. सुमारे पाच टक्के गर्भवतींमध्ये उच्च रक्तदाब आढळतो आणि यातून गंभीर स्थिती उद्‌भवण्याची शक्‍यता असते. 

जीवनशैलीत बदल आवश्‍यक 

उच्च रक्तदाब हा आजार केवळ औषधाने नियंत्रणात राहत नसून, यासाठी जीवनशैलीशी निगडित आहार, व्यायाम आदी बदलही आवश्‍यक आहेत. अनेकदा रुग्ण वर्षांनुवर्षे औषधे घेत राहतात. परंतु त्यांना फारसा फरक पडत नाही. याला चुकीची जीवनशैली हे महत्त्वाचे कारण आहे. त्यामुळे महिलांनी आपल्या जीवनशैलीत बदल करणे आवश्‍यक आहे. 

- पस्तीशी ओलांडल्यानंतर दरमहा रक्तदाबाची तपासणी करणे आवश्‍यक. 
- उच्च रक्तदाबाचे निदान झाल्यास नियमित तपासणी करावी. 
- उच्च रक्तदाब नियंत्रणासाठी आहाराच्या वेळांचे नियमन, मिठाचे प्रमाण कमी       करायला हवे. 
- दिवसभरात किमान अर्धा तास चालणे किंवा व्यायाम करणे गरजेचे आहे. 

डॉक्‍टरांचा सल्ला आवश्यक

अनेकदा रक्तदाबाची समस्या लक्षात येत नाही. इतर मोठ्या आजारांचे उपचार करताना उच्च रक्तदाबाचे निदान होते. उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनी मिठाचे सेवन कमी करावे. याचबरोबर वजनदेखील नियंत्रित ठेवण्यासाठी प्रयत्न करावे. वर्षानुवर्षे औषधे न घेता डॉक्‍टरांच्या सल्ल्याने घ्यावीत. - डॉ. राजश्री पाटील  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप कार्यकर्त्याची जेवणासाठी हाणामारी, आमदारांनी घेतलेल्या बैठकीनंतर एकमेकांच्या अंगावर गेले धावून; VIDEO VIRAL

Solapur Pune Highway Accident : ओव्हरटेक करताना कंटेनरला धडक, स्कॉर्पिओचा चुराडा; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर

CNG PNG Supply : सीएनजी-पीएनजी पुरवठ्याला गती; पुणे, पिंपरीमधील गॅस वितरण व्यवस्था अधिक सक्षम

विद्यानंद बापट यांचा २२ वर्षांपूर्वी उदय सामंत यांनी केलेला सत्कार; फोटो होतोय VIRAL

IIT Bombay Hostel: विद्यार्थ्याने गळफास घेतल्यानंतर 'आयआयटी'कडून मोठं पाऊल; छतावील पंख्यांऐवजी भिंतीवरील पंखे मागवले

SCROLL FOR NEXT