womens day 2023 Primary teacher Amrita Bhalerao travelled from Nashik to Statue of Unity on bicycle nashik news esakal
नाशिक

Womens Day 2023 : आदिवासी आश्रमशाळेच्या शिक्षिकेची 3 दिवसात 350 कि.मी.ची सायकलवारी!

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला आदिवासी विकास विभागाच्या त्रंबकेश्वर तालुक्यातील भिलमाळ येथे शासकीय आश्रमशाळेत प्राथमिक शिक्षिका अमृता भालेराव (Amrita Bhalerao) यांनी नाशिक ते स्टैच्यू ऑफ युनिटी हा प्रवास सायकलवर केला आहे. (womens day 2023 Primary teacher Amrita Bhalerao travelled from Nashik to Statue of Unity on bicycle nashik news)

अवघ्या तीन दिवसात हा ३५० किलोमीटरचा प्रवास त्यांनी सायकलवर केला आहे. महिला दिनानिमित्ताने विविध सामाजिक संस्था, महिला मंडळाकडून अनेक पारंपरिक उपक्रम महिलांसाठी राबविले जातात. महिला नारीचा सन्मान, कर्तबगार महिलांचा गुणगौरव सारखे कार्यक्रम देखील होतात.

मात्र या सर्व बाबींना फाटा देऊन अमृता भालेराव यांची नाशिक ते स्टैच्यू ऑफ युनिटी हा ३५० मीटरचा प्रवास सायकल वर केला. स्टैच्यू ऑफ युनिटी हा जगातील सर्वात उंच पुतळा असून त्याची उंची ५९७ फूट इतकी आहे. अमृता भालेराव या आदिवासी विकास विभागाच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील भिलमाळ येथे शासकीय आश्रमशाळेत प्राथमिक शिक्षिका म्हणून कार्यरत असून सध्या शैक्षणिक गुणवत्ता कक्षाच्या शैक्षणिक समन्वयक म्हणून काम बघतात.

हेही वाचा : तुमच्याकडं कागदी स्वरुपातले शेअर आहेत? मग हे वाचाच....

आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त नयना गुंडे, अपर आयुक्त (मुख्यालय) तुषार माळी आणि उपायुक्त अविनाश चव्हाण यांनी भालेराव यांना पुष्पगुच्छ देऊन शनिवारी (ता.४) शुभेच्छा दिल्या. ४ मार्च रोजी सकाळी साडेपाच वाजता त्या नाशिकहुन सायकलवर निघाल्या.

पहिल्या दिवशी सापुतारा (१०० कि.मी), दुसऱ्या दिवशी मांडवी (१३७ किमी.) आणि तिसऱ्या दिवशी स्टैच्यू ऑफ युनिटी (११३ कि.मी) असा सायकल प्रवास करत त्या सोमवारी (ता. ६) रात्री स्टैच्यू ऑफ युनिटी येथे पोहोचल्या.अखेरच्या दिवशी वातावरण खराब झाले, प्रचंड वादळ आणि विजेच्या कडकडाटासह पावसात शेवटचे २० किलोमीटरचे अंतर पार केले. भालेराव यांच्या सायकलस्वारीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur : शेतकऱ्यानं म्हशी घ्यायला ७ लाख साठवले, सहावीत शिकणाऱ्या लेकानं गेमवर ५ लाख उडवले; बँक स्टेटमेंट बघून बसला धक्का

India Vs England : दुसऱ्या कसोटीतील लाजीरवाण्या पराभवानंतर इंग्लंडचा मोठा निर्णय, 'या' वेगवान गोलंदाजाचा केला संघात समावेश

Weekly Astrology 7 to 13 July 2025: या आठवड्यात कोणत्या राशींना होणार आर्थिक लाभ अन् नोकरी व्यवसायत मिळेल उत्तम संधी, वाचा साप्ताहिक राशिभविष्य

Latest Maharashtra News Updates : मुंबईत वाहतूक ठप्प! मोनो रेल सेवा बंद, मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाडाने प्रवाशांचे हाल

Global Club Championship: पाकिस्तानला डावलण्याची शक्यता; जागतिक क्लब अजिंक्यपद स्पर्धा : पाच संघांचा सहभाग

SCROLL FOR NEXT