Five arrested for betting on IPL 2023 cricket match crime police
Five arrested for betting on IPL 2023 cricket match crime police Esakal
नाशिक

World Cup 2023: सट्टेबाजारात ‘काटे की टक्‍कर’; भारत व ऑस्‍ट्रेलियाचा दर एकसमान...

सकाळ वृत्तसेवा

World Cup 2023 : निवडणुका असो किंवा क्रिकेटचे सामने.. हवा कुठल्‍या दिशेने वाहते याचा अंदाज घेत सट्टेबाजाराच्‍या अंदाजातून लक्षात येते.

वर्ल्डकपच्‍या अंतिम लढतीकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागलेले असताना, भारत विश्‍वविजेता व्‍हावा, यासाठी देशवासीय प्रार्थना करताय. (World Cup 2023 rates are same for both teams betting market are in dilemma as to which team to bet on news)

सट्टेबाजारात मात्र भारत आणि ऑस्‍ट्रेलिया यांच्‍यात काटे की टक्‍कर बघायला मिळत आहे. दोन्‍ही संघांसाठी दर एकसमान असल्‍याने कुठल्‍या संघावर डाव लावावा, असा पेच मात्र सटोरींपुढे निर्माण झालेला आहे.

भारतात सट्टाबाजार अधिकृत नसला तरी छुप्‍या पद्धतीने कोट्यवधींचा जुगार खेळला जात असतो. विशेषतः आयपीएलसारख्या लोकप्रिय क्रिकेट स्‍पर्धा असतील किंवा लोकसभा, विधानसभा निवडणुका अशा महत्त्वाच्‍या लढतींमध्ये सट्टा बाजाराचा कल कुठल्‍या दिशेने आहे, त्‍यावरुन निकालाचा अंदाज लावला जात असतो. वर्ल्डकप स्‍पर्धेसाठीदेखील सटोरी चांगलेच सक्रिय झालेले आहेत.

रविवारी (ता.१९) होत असलेल्‍या भारत विरुद्ध ऑस्‍ट्रेलिया यांच्‍यातील सामन्याकरिता एजंट्‌सकडे दरांची चौकशी केली जाते आहे. दरम्‍यान भारत आणि ऑस्‍ट्रेलिया या दोन्‍ही संघांचे दर एकसारखे असल्‍याने सट्टा बाजारालाही अचूक अंदाज सांगणे कठीण बनले असल्‍याचे यातून स्‍पष्ट होत आहे. सामना चुरशीचा होण्याची शक्‍यता वधारली असून, सामन्‍यातील महत्त्वाच्‍या टप्‍यांनुसार दरांमध्ये बदल केला जाणार आहे.

असे आहेत सट्टेबाजारातील दर..

शनिवारी दुपारपर्यंत सट्टेबाजारात भारत व ऑस्‍ट्रेलिया अशा दोन्‍ही संघांचे दर ४५ पैशांच्या दरम्‍यान होते. अर्थात शंभर रुपये लावणाऱ्या व्‍यक्‍तीस संबंधित संघ जिंकल्‍यावर ४५ रुपये मिळतील. दरम्‍यान नाणेफेक आणि सामन्‍यातील महत्त्वाच्‍या टप्‍यांनुसार सट्टेबाजारातील दरांमध्ये बदल केला जाणार असल्‍याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Porsche Accindet: कोणालाही पाठीशी घालणार नाही; अजित पवारांनी केले स्पष्ट

Latest Marathi News Live Update: बंगालमध्ये वाद पेटला, TMC-ISF समर्थकांमध्ये हाणामारी, भाजपचा आरोप- पराभवाच्या भीतीने हिंसाचार

Amhi Jarange: 'आम्ही जरांगे -गरजवंत मराठ्यांचा लढा' चित्रपटात 'हा' अभिनेता साकारणार अण्णासाहेब पाटलांची भूमिका; टीझर रिलीज

Cristiano Ronaldo: शेवटच्या क्षणी पराभव, नेमारनंही डिवचलं अन् रोनाल्डोला अखेर अश्रु अनावर, पाहा Video

Chennai-Mumbai Flight: 172 प्रवाशांच्या जीवाशी खेळ, चेन्नई-मुंबई फ्लाईटमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी, विमान अज्ञात स्थळी हलवले

SCROLL FOR NEXT