Tribal Development Commissioner Nayana Gunde inspecting the Central Kitchen.  esakal
नाशिक

World Tribal Day 2023 :सेंट्रल किंचनमुळे मिळतो सकस- ताजा आहार; 4 नव्या सेंट्रल किचनचे प्रस्ताव मंजूर

सकाळ वृत्तसेवा

World Tribal Day 2023 : आदिवासी विभागातील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना आहारासाठी राज्यात पाच ठिकाणी सेंट्रल किचन सुरू असून, यात एकूण ७६ हजार ६५७ विद्यार्थ्यांना ताजे भोजन दिले जाते.

मुंढेगाव येथील (राज्यस्तर योजना) सेंट्रल किचनमधून जिल्ह्यातील ४१ शासकीय आश्रमशाळा जोडलेल्या असून, यातून १५ हजार २९ विद्यार्थ्यांना वेळेत सकस व ताजा आहार दिला जातो.

अल्पावधीत सेंट्रल किचन संकल्पना सर्वदूर पसरल्याने राज्यात चार ठिकाणी ३७ हजार विद्यार्थ्यांना आहार पोचविण्यासाठी सेंट्रल किचन, तर ४५ हजार विद्यार्थ्यांसाठी लघु किचन सुरू करण्याचा प्रस्ताव सादर झालेला असून, त्यास दोन टप्प्यांत मंजुरी मिळालेली आहे. त्यामुळे हे किचनही लवकरच सुरू होईल. (World Tribal Day 2023 Proposals for 4 new central kitchens approved for 37 thousand students in state nashik news)

टाटा ट्रस्ट व अक्षय पात्रा फाउंडेशन यांच्या सहकार्याने सेंट्रल किचन सुरू करण्यात आले आहे. मुंढेगाव येथील मध्यवर्ती स्वयंपाकगृह ४ सप्टेंबर २०१५ पासून, तर कांबळगाव (जि. पालघर) येथील मध्यवर्ती स्वयंपाकगृह ५ डिसेंबर २०१५ पासून सुरू आहे. कांबळगाव येथील सेंट्रल किचनला एकूण ३६ शासकीय आश्रमशाळा जोडलेल्या असून, त्यात एकूण १७ हजार ५५९ एवढ्या विद्यार्थ्यांना सेंट्रल किचनमार्फत भोजन पुरवठा करण्यात येत आहे.

२४ तास सुरू असते सेंट्रल किचन

मुंढेगाव येथील सेंट्रल किचन हे २४ तास सुरू असते. रात्री दोन ते पहाटे पाच या वेळात सकाळचा नाश्ता तयार केला जातो. तयार झालेला नाश्त्याच्या गाड्या साडेपाचला निघतात. सकाळी साडेसातला विद्यार्थ्यांना नाश्ता दिला जातो. सकाळी सहा ते नऊदरम्यान जेवण तयार केले जाते. साडेनऊला जेवणाचे डबे घेऊन वाहने निघतात.

ती दुपारी बारा ते साडेबारादरम्यान शाळांवर पोहोचतात. बारा ते तीनदरम्यान दुपारचा नाश्ता तयार केला जातो. तीनला नाश्ता घेऊन वाहने निघतात, ती साडेचारला शाळांवर पोहोचून नाश्ता दिला जातो. दुपारी दीड ते साडेचारदरम्यान सायंकाळच्या जेवणाचे डबे होतात.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

साडेचारला हे डबे वाहनांद्वारे शाळांवर सायंकाळी साडेसहा ते सातदरम्यान पोहोचतात. सातला विद्यार्थ्यांना जेवण दिले जाते. सकाळी पहिल्या टप्प्यात नाश्ता व दुपारचे जेवण, तसेच दुपारी चारला पुन्हा नाश्ता व रात्रीचे जेवण देण्यासाठी २२ वाहनांची (पिकअप वाहन) व्यवस्था करण्यात आलेली आहे.

जिल्ह्यात प्रस्तावित सेंट्रल किचन

अप्पर आयुक्त किचन ठिकाण व संख्या शाळांची संख्या विद्यार्थी संख्या

नाशिक कळवण (२ ठिकाणी)

चणकापूर व माणी २९ शाळा + २० वसतिगृहे २० हजार

धुळे (रोहोड) १३ शाळा + १२ वसतिगृहे ६ हजार

प्रस्तावित लघु सेमी सेंट्रल किचन

नाशिक तळोदा (५) २८ शाळा + ११ वसतिगृहे १५ हजार

नाशिक (१) व राजूर (१) २७ शाळा + १ वसतिगृह ९ हजार

यावल (२) १७ शाळा + १३ वसतिगृहे ६ हजार

केंद्रीय सेंट्रल किचन

राज्यस्तरापाठोपाठ केंद्रीय योजना स्तरावरही स्त्रीशक्ती संस्था व आदिवासी विकास विभाग यांच्यामार्फत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प घोडेगाव, नंदुरबार व जव्हार यांच्या कार्यक्षेत्रात संयुक्तपणे राबविला जात आहे.

आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक व स्त्री शक्ती संस्था, विक्रोळी, मुंबई यांच्याबरोबर २५ जानेवारी २०१९ ला करारनामा करण्यात आला. नंदुरबार व जव्हार या प्रकल्प क्षेत्रात मध्यवर्ती स्वयंपाकगृह सुरू करण्यात आले.

नंदुरबार येथील सेंट्रल किचनला ४२ शाळा जोडलेल्या असून, त्यात एकूण १७ हजार ८७७ विद्यार्थ्यांना सेंट्रल किचनमार्फत भोजनपुरवठा करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मी शेवटचा..., बूटफेकीच्या घटनेनंतर काय म्हणाले सरन्यायाधीश? सुप्रीम कोर्टात काय घडलं?

Gautami Patil: अपघातावेळी गौतमी पाटील गाडीमध्ये होती का? पुणे पोलिसांनी तपासले शंभर सीसीटीव्ही

Rahul Dravid Son: ४८ ब्राऊंड्री अन् ४५९ धावा... द्रविडच्या धाकट्या लेकाच्या कारनामा; KSCA कडून झाला मोठा सन्मान

पालघरमधील तीन नगराध्यक्षांचे आरक्षण जाहीर! डहाणूत सामान्य, जव्हारमध्ये सर्वसाधारण महिला तर पालघरमध्ये ओबीसीचे आरक्षण

विनोद खन्नांचा मृत्यू कसा झालेला माहितीये? ६ वर्ष जगापासून लपवलेलं ते सत्य; एकटेच कुढत काढलेले दिवस, अखेर...

SCROLL FOR NEXT