Rahul Bansode esakal
नाशिक

Nashik News : लेखक राहुल बनसोडे यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : लेखक, पर्यावरणवादी कार्यकर्ते आणि आयटी व्यावसायिक राहुल बनसोडे यांचे शुक्रवारी (ता. २४) दुपारी हृदयविकाराने निधन झाले. ते ४५ वर्षांचे होते. त्यांच्यामागे नऊ वर्षांचा मुलगा, एक वर्षाची मुलगी, पत्नी, आई व वडील असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने साहित्य क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. (Writer Rahul Bansode passed away Nashik News)

अशोका मार्गावरील रहिवासी असलेले राहुल बनसोडे शुक्रवारी दुपारी आपल्या कार्यालयाच्या पायऱ्या चढत असताना त्यांना त्रास जाणवू लागला. यानंतर त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथील डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.

बनसोडे सॉफ्टवेअर इंजिनिअर क्षेत्रात असले तरी सांस्कृतिक व साहित्य क्षेत्रात त्यांनी भरीव योगदान दिले. त्यांनी ‘अॅप्लिकेशन नेक्सस’ नावाची सॉफ्टवेअर कंपनी स्थापन केली होती, तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात, कृत्रिम बुद्धिमत्ता, दक्षिण आधुनिक व अनॉमिक्स कन्टेन्ट अशी नाटके त्यांनी लिहिली.

हेही वाचा : एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!

‘जीवाश्म’, ‘उद्या’, ‘परीचा ड्रेस’ या लघुपटांत त्यांनी मुख्य भूमिका केल्या आहेत. याव्यतिरिक्त पर्यावरण संवर्धनासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात योगदान दिले. वर्तमानपत्र तसेच नियतकालिकांसाठी त्यांनी विपुल लेखन केले.

त्यांच्या निधनाची बातमी समजतात साहित्य, सांस्कृतिक क्षेत्रांतील मान्यवरांनी शोकभावना व्यक्त केल्या. राहुल बनसोडे यांच्या पार्थिवावर रात्री उशिरा अंत्यंसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर, आप्तेष्ट उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

SCROLL FOR NEXT