Nashik District Collector Gangatharan D. esakal
नाशिक

Nashik News : बंदी उठवल्याने यात्रा-जनावर बाजार पूर्ववत

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : जिल्ह्यात जनावरांच्या लंपी आजाराचा प्रादुर्भाव कमी झाल्याने जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी यात्रा आणि जनावर बाजारावरील बंदी उठवली आहे. दरम्यान, बैलगाडी शर्यतीवरील बंदी आणि जनावरांच्या बाजाराला परवानग्या दिल्याने नागरिकांना शर्यतीचा आनंद घेता येणार आहे.

राज्यभरात लंपी आजाराने अनेक शेतकऱ्यांनी जनावरे गमावली. त्यामुळे अनेक दिवसांपासून जिल्ह्यात गोवंश जाती प्रजातीची सर्व गुरे मशिनची वाहतूक करण्यास तसेच वैरण, गवत, चारा किंवा अन्य साहित्य बाधित प्राण्यांचे मृतदेह कातडी व शरीराच्या कोणत्याही भागाची वाहतूक करण्यास मज्जाव होता. (Yatra cattle market restored as ban lifted Decision as lumpy disease is under control in Nashik district Nashik News)

हेही वाचा : द मिसिंग टाइल सिंड्रोम ठेवा आपल्यापासून दूर

खबरदारीचा उपाय म्हणून नाशिक जिल्ह्यात कोठेही प्राण्यांचे बाजार, प्रदर्शन, बैलगाडा शर्यती भरून भरवता येणार आहेत. तसेच गुरांची वाहतूक यावर निर्बंध होते. केंद्र सरकारच्या वतीने घालून दिलेल्या काही मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक राहणार असल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

नाशिक जिल्ह्यातील घोटी, सिन्नर या ठिकाणी बैल बाजार भरवला जात होता. यावेळी खरेदी- विक्रीच्या माध्यमातून मोठी आर्थिक उलाढाल होत होती. मात्र यावर बंदी आल्याने ही उलाढाल ठप्प झाली होती. जिल्हाधिकारी यांनी आता बंदी उठविल्याने पुन्हा एकदा जनावरांचा बाजार जिल्ह्यात तालुक्याच्या ठिकाणी गजबजलेला पहावयास मिळणार आहे.

- वाहतुकीसाठी २८ दिवस आधी लसीकरण झाले असावे.

- जनावरांची ओळख पटविण्यासाठी क्रमांक, इनाफ पोर्टलवर नोंदणी

- वाहतुकीसाठी आरोग्य प्रमाणपत्र, आरोग्य दाखला बाळगणे आवश्‍यक

- पशू बाजारात प्रदर्शन बैलगाडा शर्यत आयोजकांना टॅगिंग पॉलिसीची खात्री गरजेची.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND W vs PAK W: भारतीय रणरागिणींनीही पाकिस्तानला दाखवला इंगा, वर्ल्ड कप सामन्यात चारली पराभवाची धूळ

World Cup 2025: भारताने पाकिस्तानवर विजय मिळवल्यानंतर हस्तांदोलन केलं की नाही? सामन्यानंतर काय घडलं जाणून घ्या

IND A vs AUS A: प्रभसिमरनचं वादळी शतक, तर श्रेयस अय्यर-रियान परागचीही फिफ्टी! भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध जिंकली ODI सिरीज

Coldrif Cough Syrup च्या दूषित बॅचवर बंदी! महाराष्ट्र एफडीएचा अलर्ट जारी, तक्रारीसाठी मोबाईल क्रमांक आणि ईमेल जाहीर

Crime: पक्षातील सदस्याला अडकवण्यासाठी घरात स्फोटके आणि दारू ठेवली, पण काँग्रेस नेता स्वत:च अडकला अन्...; काय घडलं?

SCROLL FOR NEXT